शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात आॅनलाईन सेवेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 01:46 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मोठा गाजावाजा करून आॅनलाईन सेवेचा प्रारंभ झाला. मात्र, या सेवा केवळ विद्यापीठाच्या संकेत स्थळावर शोभेपुरत्या ठरल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगातून आॅनलाइन सेवेसाठी खर्च झालेले ७२ लाख रुपये वाया तर गेले नाही, अशी ओरड सुरू झाली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाकडून चालढकल : कारभार कागदोपत्रीच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मोठा गाजावाजा करून आॅनलाईन सेवेचा प्रारंभ झाला. मात्र, या सेवा केवळ विद्यापीठाच्या संकेत स्थळावर शोभेपुरत्या ठरल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगातून आॅनलाइन सेवेसाठी खर्च झालेले ७२ लाख रुपये वाया तर गेले नाही, अशी ओरड सुरू झाली आहे.आॅनलाइन सेवा सुरू व्हावी, यासाठी डॉटकॉम कंपनीकडे जबाबदारी सोपविण्यात आली. त्याकरिता मॉड्युल्स तयार देण्याबाबतचा करार करण्यात आला. डॉटकॉमकडून योग्य रीत्या कामे करून घेण्यात विद्यापीठ प्रशासन यशस्वी ठरले. फाइल ट्रॅकिंग नावाचे अप्लिकेशन विद्यापीठाच्या संकेत स्थळावर असले तरी हे अप्लिकेशन कार्यान्वीतच नसल्याचे विद्यापीठाच्या आॅनलाइन सेवा केवळ नावापुरत्या असल्याची ओरड आता कर्मचारी, अधिकाऱ्यांमधून सुरू झाली आहे. माहिती अधिकाराचा अर्ज सादर करताना अनंत अडचणी येत आहेत. अर्ज योग्यरीत्या भरला जातो. मात्र, त्याचे आॅनलाइन पेमेंट करण्यासाठी गेल्यानंतर पेमेंटची लिंकच उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे. विद्यापीठाने गेल्या दोन वर्षांपासून डॉटकॉम कंपनीला सदर काम बहाल केले आहे. मात्र, या कंपनीचा कारभार कासवापेक्षाही धिम्या गतीने चालत असल्याने विद्यापीठाच्या आॅनलाइन सेवा सुरू होण्यासाठी आणखी किती वर्षे लागतील, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.अडीच वर्षांनंतरही आॅनलाईन सेवा नाहीविद्यापीठाला काटेकोरपणे नियमांचे पालन करून कामकाज केले जाते. प्रत्येक वेळी अधिकारी, कर्मचारी नियमांचे दाखले देतात. आॅनलाइन सेवा वर्षभरात सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण होऊनही ही सेवा सुरू झाली नाही. विद्यापीठाच्या संकेत स्थळावर आॅनलाइन मॉड्युुल्सचे निव्वळ देखावे सादर केलेले असून काही मॉड्युुल्स वगळता अन्य मॉड्युुल्स प्रत्यक्षात कार्यरत नाहीत. त्यामुळे कुलसचिवांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.‘डॉटकॉम’च्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हडॉटकॉम कंपनीला आॅनलाइन सेवांचे कामे देण्यात आले आहे. आतापर्यंत कामे पूर्णत्वास आले नाही. जे काही सुरू झाले, यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. वित्त विभागाचे कामकाज आॅनलाइन करण्यासाठी विद्यापीठ गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नरत आहे. मात्र, ते आॅनलाइन केव्हा होणार, हा प्रश्न कायम आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर हे सातत्याने त्यासाठी प्रयत्नशिल आहेत. तथापि, या कंपनीकडून मात्र अपेक्षित काम पूर्ण होत नसल्याने कंपनीच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :universityविद्यापीठ