शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आवास योजनेच्या ६० घरकुलांचा ऑनलाईन ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:12 IST

अमरावती : महानगरपालिका हद्दीत ८६० घरकुलांचा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. यातील ६० लाभार्थ्यांना मंगळवारी म्हसला येथील भूखंडावरील सदनिकेचा ...

अमरावती : महानगरपालिका हद्दीत ८६० घरकुलांचा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. यातील ६० लाभार्थ्यांना मंगळवारी म्हसला येथील भूखंडावरील सदनिकेचा ताबा देण्यात आला. या कार्यक्रमात पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह आमदार व पदाधिकाऱ्यांनी ऑनलाईन सहभाग नोंदविला.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सदनिका वितरण सोहळा महापालिकेतील कॉन्‍फरन्‍स हॉलमध्‍ये आयोजित करण्‍यात आला होता. ला 'सन २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे' संकल्पनेतून प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न पूर्ण व्हावे. या संकल्पनेतूनच म्हसला येथील घरकुलांचे वितरण ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. या योजनेंतर्गत म्हसला येथे चार मजली इमारतीत ६० सदनिका बांधण्यात आल्या असून, प्रत्येक सदनिकांचे चटई क्षेत्रफळ ३२३ चौरस फूट असून सर्व सुविधांसह (विद्युत, २४ तास पाणी, वाहन पार्किंग) लाभार्थ्यांना विक्री किंमत ९.४८ लाखांत २.५० लाख रुपये अनुदान वगळता लाभार्थी हिस्सा निव्वळ ६.९८ लाख भरावयाचा आहे. योजनेच्या घटक ४ मध्ये (आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक) अंतर्गत ३६८ कोटींमधून ६,९१३ घरकुलांची कामे प्रगतीत असल्याचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले. ऑनलाईन कार्यक्रमात ना. यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा, महापौर चेतन गावंडे, सभागृह नेता तुषार भारतीय आदींनी लाभार्थ्यांना गुढीपाडवा तसेच नवीन गृहप्रवेशाच्या शुभेच्‍छा दिल्यात. कार्यक्रमाला सर्व पदाधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते.