श्यामकांत पाण्डेय ।लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : मोबाईलवर ऑनलाईन लॉटरी लागल्याचा संदेश पाठवून लाखो रुपये ऑनलाऊन उकळण्याचा प्रकार मेळघाटात सर्रास सुरू आहे. एसएमएस करणारे भामटे स्वत:च्या बँक खाते क्रमांकावर काही रक्कम टाकण्यास सांगतात. हव्यासापोटी त्या बँक खात्यात काही रक्कम टाकली जाते. मात्र वारंवार वेगळी कारणे सांगून मोढी रक्कम उकळली जाते. हा सर्व गोरखधंदा ऑनलाईन केला जात आहे. परिणामी मेळघाटातील गोरगरिब व आदिवासी ग्रामस्थ, तरूण नाडविले जात आहेत. मात्र लोक काय म्हणतिल, या भीतीपोटी सायबर पोलिसांमध्ये तक्रार करण्यास कुणीही धजावत नाही.ऑनलाइन फसवणूक करणारे खोटी आणि चुकीची माहिती देऊन आपली लॉटरी लागली आहे व आपणास 10 लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत लॉटरीचे बक्षीस मिळणार आहे, असे संदेश एसएमएसद्वारे पाठविले जात आहेत. काही कागदोपत्री सोपस्कार पार पाडण्यासाठी सुरुवातीला आठ हजार रुपये एक खाते क्रमांक देऊन ऑनलाईन जमा करण्याची सूचना पाठविण्यात येते. सूचनांचे पालन केल्यानंतर जाळ्यात अडकलेल्यांना पुन्हा काही दिवसानंतर इन्कम टॅक्स आणि इतर कर भरणा करण्यासाठी १५ हजार रूपये ऑनलाईन भरण्याचा संदेश प्राप्त होतो. १० ते १५हजार रुपये भरून १ कोटी मिळतिल, या लालसेपोटी ती रक्कम भरली जाते. मात्र त्यानंतर संदेशासोबतच संबंधित फोन कॉलही बंद होत असल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येते.सायबर पोलिसांत करा तक्रार२५ लाख ते १ कोटी रुपये लॉटरी लागल्याची बतावणी करून अनेकांना १५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत ऑनलाईन फसविले गेल्याच्या घटना धारणी चिखलदऱ्यात ताज्या आहेत. मात्र झालेली फसवणूक न दडविता नाडवल्या गेलेल्या नागरिकांनी सायबर पोलिसाांकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
लॉटरीच्या नावावर ऑनलाईन फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:00 IST
ऑनलाइन फसवणूक करणारे खोटी आणि चुकीची माहिती देऊन आपली लॉटरी लागली आहे व आपणास 10 लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत लॉटरीचे बक्षीस मिळणार आहे, असे संदेश एसएमएसद्वारे पाठविले जात आहेत. काही कागदोपत्री सोपस्कार पार पाडण्यासाठी सुरुवातीला आठ हजार रुपये एक खाते क्रमांक देऊन ऑनलाईन जमा करण्याची सूचना पाठविण्यात येते.
लॉटरीच्या नावावर ऑनलाईन फसवणूक
ठळक मुद्देएसएमएसने दिली जाते खूषखबर : प्रलोभनापोटी आदिवासी, गरिबांची लूट