शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

आरटीओची आॅनलाईन अपॉईमेंटची सक्ती

By admin | Updated: December 16, 2014 22:44 IST

शिकाऊ पाठोपाठ आता कायम वाहन परवान्यासाठी आॅनलाईन अपाईमेंटची सक्ती सुरू झाली आहे. संगणक, इंटननेट साक्षरतेच्या अभावाने आरटीओ कार्यालयाची ही सक्ती सामान्य उमेदवारांची डोकेदुखी बनली आहे.

जितेंद्र दखणे - अमरावतीशिकाऊ पाठोपाठ आता कायम वाहन परवान्यासाठी आॅनलाईन अपाईमेंटची सक्ती सुरू झाली आहे. संगणक, इंटननेट साक्षरतेच्या अभावाने आरटीओ कार्यालयाची ही सक्ती सामान्य उमेदवारांची डोकेदुखी बनली आहे. संधीचा फायदा उठविणाऱ्या कॅफे दुकानदारी मात्र सध्या तेजीत सुरू आहे. सकारात्मक दृष्टीने केलेल्या बदलास आमचा विरोध नाही. पण त्याला ऐच्छिक पर्यायही ठेवा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.परवाना काढण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांचा वेळ, श्रम आणि पैशाची बचत व्हावी, त्याचबरोबर एजंटगिरीला आळा बसावा, या उद्देशाने शासनातर्फे शिकाऊ परवान्यासाठी आॅनलाईन अपॉईटमेंटची सक्ती करण्यात आली. त्याची अंमलबजावणी १ सष्टेंबरपासून प्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरूवात झाली. उमेदवाराने आपल्या सवडीप्रमाणे परवान्यासाठी अपॉर्इंटमेंट वेळ घ्यायची त्यानुसार परवान्यासाठीच्या चाचण्या द्यायच्या, हा त्यामागील हेतू होता. पण आज घरोघरी संगणक नाही, तशा प्रकारचे स्मार्ट मोबाईल संच नाहीत, इंटनेट साक्षरतेचे प्रमाण अद्याप अत्यंत कमी आहे. अशा असाक्षर लोकांना आॅनलाईन अपॉर्इंटमेंटचा फार्म भरणे म्हणजे एक दिव्य काम वाटू लागले आहे. वाहनाचा परवाना काढायचा म्हटल्यानंतर आॅनलाईन अपाईमेंट आली, त्यासाठी सामान्य उमेदवारांना नेट कॅफेशिवाय दुसरा पर्याय नाही. नेट कॅफेमधूनही अपार्इंटमेंट घ्येण्याचा आॅनलाईन फॉर्म भरून दिला जातो. त्यासाठी मनमानी रक्कम आकारली जाते. सध्या कार्यालयाच्या परिसरातल्या छोट्या दुकानांतून मोठ्या प्रमाणावर आॅनलाईन फॉर्म भरूण देण्याची सुविधा उपलब्ध आहे. एरवी शिकाऊ परवान्यासाठी ३० रूपये ते १५० रूपये आकारले जात आहेत, ही फक्त अपॉईमेंट आहे, परीक्षा तुम्हालाच द्यावी लागणार आहे. यात पास झाला, तर शिकाऊ परवाना मिळेल, असे सांगीतले जात आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आरटीओ कार्यालयाकडून सुरू झाली आहे. पक्का परवान्यासाठी आवश्यक कागदपत्राबरोबरच ३११ रूपये शुल्क भरले की, उमेदवाराला पुढील चाचण्या देता येत होत्या. मात्र आता पुन्हा आॅनलाईन अपॉर्इंटमेंटची अडचण आहे. या प्रक्रियेसाठी नेट कॅफेकडून खिशाला कितीची कात्रू लागेल, याचा नेम नाही. तसेच उमेदवारांच्या तुलनेत कार्यालयात अधिकाऱ्यांची संख्या नाही. त्यामुळे अपॉईटमेंट कधी मिळेल. चाचणीत अपयश आले तर, पुन्हा नवी अपॉईटमेंट कशी मिळवायची असे विविध प्रश्न सामान्य उमेदवारांसमोर आहेत. आरटीओ कार्यालयात आॅनलाईन फॉर्म भरण्याची सोय नाही. त्यामुळे या सक्तीबाबत पुन्हा विचार करण्यात यावा अथवा ऐच्छिक पर्यायाची सोय उपलब्ध करून द्यावी.