मार्च २०१६ परीक्षा : ३१ आॅगस्टपर्यंत अर्ज सादरअमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च २०१६ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेचे आॅनलाईन अर्ज १७ आॅगस्टपासून भरता येणार आहे. उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत ३१ आॅगस्टपर्यंत आॅनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. अमरावती विभागीय शिक्षण मंडळ अंतर्गत विभागातील विविध केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. बारावीच्या परीक्षेत प्रविष्ट होता यावे म्हणून १७ ते ३१ आॅगस्टदरम्यान, आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर १ ते ५ सप्टेंबरदरम्यान उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ट महाविद्यालयांनी चलनाद्वारे बँकेत परीक्षा शुल्क भरण्याची मुदत देण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षेचे अर्ज आॅनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात संपर्क करावा लागणार आहे. परीक्षा शुल्क चलानद्वारे बँक आॅफ इंडियामध्ये शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात भरावे लागणार आहे. शिवाय शुल्क भरण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या याद्या अमरावती विभागीय बोर्डाकडे सादर कराव्या लागणार आहेत. आॅनलाईन परीक्षा अर्जामध्ये आधार क्रमांकाची नव्याने जागा करण्यात आली आहे. आधार क्रमांक उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांना अर्जात तो भरावा लागणार आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक नाही. त्यांच्याकरिता भरणे बंधनकारक नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. अर्ज भरण्याची मुदतनियमित शुल्कअर्जाची तारीख १७ ते ३१ आॅगस्ट चलान मुदत १ ते ५ सप्टेंबरयाद्या- ८ सप्टेंबरविलंब शुल्कअर्जाची तारीख १ ते ८ सप्टेंबरचलान मुदत ९ ते १५ सप्टेंबरयाद्या १८ सप्टेंबर
बारावीच्या परीक्षेची आॅनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू
By admin | Updated: August 18, 2015 00:16 IST