शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचे भाव वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 23:41 IST

हल्ली बाजारपेठेत ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो दराने कांदे विकले जात आहेत. गत आठवड्यात झालेल्या पावसाने कांदा उत्पादनाला फटका बसला आहे.

ठळक मुद्देप्रतिकिलो ४५ रुपये : अवकाळी पावसाने नव्या उत्पादनाला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हल्ली बाजारपेठेत ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो दराने कांदे विकले जात आहेत. गत आठवड्यात झालेल्या पावसाने कांदा उत्पादनाला फटका बसला आहे. जुन्या कांद्याची आवक सप्टेंबरअखेर मंदावली, तर नव्या उत्पादनाचे कांदे खराब झाले आहेत. त्यामुळे २० दिवसातच दर दुप्पट झाला आहे.शेतकºयांनी उन्हाळ्यात कांद्याचे उत्पादन घेतले तेव्हा मे २०१७ मध्ये शेतकºयांच्या कांद्याला बाजारात ५ ते ६ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. आता पाच महिन्यांनंतर शेतकºयांचा कांदा बंद होताच आॅक्टोबरमध्ये ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो दर आहे. आॅगस्टपर्यंत १० ते १५ रुपये तर सप्टेंबर महिन्यात २० रुपये किलो दराने कांदा विकला गेला, अशी माहिती कांदा विक्रेते किशोर खारकर यांनी दिली. जिल्ह्यात परतवाडा, अचलपूर, मोर्शी, दर्यापूर, अंजनगाव बारी, चांदूरबाजार या भागात प्रामुख्याने कांद्याचे उत्पादन घेतले जाते. पावसाळी कांदा ऐन कापणीवर आला असताना परतीच्या पावसाने तो सडला. परिणामी बाजारपेठत त्याला भाव मिळत नाहीे. पावसाने फटका बसलेला कांदा बाजारपेठेत आणल्यानंतर वाहतुकीचा खर्च निघत नाही, अशी विदारक स्थिती आहे.उन्हाळी कांद्याचे उत्पादन सप्टेंबरमध्येच संपुष्टात आले. आॅक्टोबर महिन्यात नवा कांदा आल्यानंतर थोडाफार भावात दिलासा मिळेल, असे अपेक्षित होते. परंतु परतीच्या पावसाने कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान केले आहे. बाजार समितीत लासलगाव, कोल्हापूर, नाशिकसह गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून कांदा विक्रीसाठी मागविला जात आहे. लालसगावचा लाल रंगाचा कांदा असून, ठोक भाव ३८०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल आहे. कांद्याची आवक कमी झाल्यास पुढील दोन महिन्यात कांदा ८० ते १०० रुपये प्रतिकिलो दरावर पोहोचेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.२गुजरात, कर्नाटकातील कांद्यावर भिस्तपरतीच्या पावसाने राज्यात कांद्याचे उत्पादन कमालीचे घटले आहे. बाजारपेठेत मागणीनुसार कांदा येत नसल्याने भाववाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या काळात राज्याला कर्नाटक, गुजरात येथून कांदा मागवावा लागेल. काही प्रमाणात उत्तरप्रदेशातूनही कांदा विक्रीसाठी आणला जाईल, अशी माहिती आहे.पावसाळी कांदा उत्पादनातून अधिक आर्थिक लाभ मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, परतीच्या अवकाळी पावसाने कांद्याचे नुकसान केले आहे. कांदा खराब झाला असून, त्याला बाजारपेठेत भाव नाहीे. कांदा काढणीचा खर्चदेखील निघणे कठीण आहे.- सुनील शेरेवार,कांदा उत्पादक, बङनेराजुना कांदा बाजारेपेठेत येणे जवळपास बंद झाला आहे. पावसाळी कांद्याचे उत्पादन घटले असून, अवकाळी पावसाने यात भर घातली आहे. हीच परिस्थिती कायम असल्यास येत्या दोन महिन्यांत ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने कांदा विकला जाईल.- सतीश कावरे,कांदा व्यापारी, बाजार समिती