शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा; भाव नीचांकीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 22:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील फळ व भाजी बाजारात शेतकऱ्यांकडून आलेला कांद्याला उत्पादनापेक्षाही कमी भाव मिळत आहे. उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. तोच कांदा खासगी किरकोळ व्यापाऱ्यांनी विकत घेतल्यानंतर कृत्रिम भाववाढ करण्यात आल्याची चिन्हे आहेत. पांढºया कांद्याला क्विंटलमागे कमीत कमी २००, तर जास्तीत जास्त ६०० रुपये भाव शनिवारी मिळाला.शेतकऱ्यांच्या ...

ठळक मुद्देकिमान २०० रुपये क्विंटल : बाजारात किरकोळ भाव मात्र १५ रुपये, ग्राहकांना दिलासा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील फळ व भाजी बाजारात शेतकऱ्यांकडून आलेला कांद्याला उत्पादनापेक्षाही कमी भाव मिळत आहे. उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. तोच कांदा खासगी किरकोळ व्यापाऱ्यांनी विकत घेतल्यानंतर कृत्रिम भाववाढ करण्यात आल्याची चिन्हे आहेत. पांढºया कांद्याला क्विंटलमागे कमीत कमी २००, तर जास्तीत जास्त ६०० रुपये भाव शनिवारी मिळाला.शेतकऱ्यांच्या लाल व पांढºया कांद्याला चार ते सहा रुपये भाव मिळत आहेत. तर हाच कांदा किरकोळ व्यापाऱ्यांनी विकत घेतल्यानंतर तो जेव्हा ग्राहकांना विकला जातो, तो पंधरा ते वीस रुपये जातो. फळ व भाजी बाजारातून माहिती घेतली असता, पांढऱ्या कांद्याची आवक ४६५ क्विंटल होती. कमीत कमी २०० रुपये क्विंटलमागे भाव मिळाला, तर जास्तात जास्त ६०० रुपये भाव मिळाला, तर लाल कांद्याची आवक २४५ क्विंटल झाली. या कांद्यालाही भाव नसून कमीत कमी ३०० रूपये क्विंटल ते जास्तीत जास्त ५०० रुपये क्विंटल एवढा भाव मिळला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चसुद्धा काढणे अवगळ झाल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.सकाळी हर्रास झाल्यानंतर खासगी किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी कृत्रिम भाववाढ केली आहे. मात्र, जो शेतकरी शेतात राबराब राबून शेती उत्पादन काढतो, त्याला भाजीपाल्याला उत्तम भाव मिळविण्यात अपयश येत आहे. पिकाला व्यापाऱ्यांकडून भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत कांद्याने पाणी आणले आहे. कांद्याच्या उत्पादन खर्चामध्ये क्विंटलमागे खर्च जास्त होत असल्याने कांद्याचे पिक घ्यावे की नाही, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे.