शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

‘ट्रायबल’मध्ये केंद्राचे एक हजार कोटी नियोजनाच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 10:51 IST

राज्याच्या आदिवासी विकास विभागात सुमारे एक हजार कोटी अखर्चित असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय विशेष साहाय्य निधीकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष

गणेश वासनिक ।आॅनलाईन लोकमतअमरावती : आदिवासींच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून राज्याला मिळणारे विशेष केंद्रीय साहाय्य निधीचे गत तीन वर्षांपासून नियोजनच नाही. त्यामुळे राज्याच्या आदिवासी विकास विभागात सुमारे एक हजार कोटी अखर्चित असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. आता कुठे आॅगस्ट २०१७ मध्ये गतवर्षीच्या निधीचे नियोजन करण्यात आले.राज्याला मिळणारा विशेष केंद्रीय साहाय्य निधी कुठे, कसा खर्च करावा याची मार्गदर्शक तत्त्वे केंद्र सरकारने ठरविली आहेत. परंतु गत तीन वर्षांपासून या निधीचे राज्य शासनाने नियोजन केले नाही. एकट्या अमरावती अपर आयुक्त कार्यालय स्तरावरील सात प्रकल्पांमध्ये या निधीचे सुमारे १०० कोटी अखर्चित असल्याची माहिती मिळाली आहे. नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर अपर आयुक्त कार्यालय स्तरावर २०१६-२०१७ मध्ये प्राप्त गतवर्षीच्या निधीचे आॅगस्ट २०१७ मध्ये नियोजन करण्यात आले आहे. या निधीतून १२८१०.३८ लक्ष निधीच्या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी ७६८६.२३ लक्ष निधीपैकी ७४७२.६३ लक्ष निधीचे वाटप करण्याबाबत विवरणपत्र चारही अपर आयुक्त व आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था, पुणे यांना पाठविले आहे. २१३.६० लक्ष रुपयांचा निधी सहायक प्रकल्प अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. याबाबत आदिवासी विकास आयुक्त आर.जी. कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता, ते रजेवर असल्याची माहिती मिळाली.

निधीतून होणारी कामेआदिवासी विद्यार्थी आश्रमशाळा, वसतिगृहांना सोईसुविधा, वाचनालय, शिष्यवृत्ती, संगणकीकरण, ग्रीन जीम व मिनी क्रीडा संकुल साकारणे, पाणी पुरवठा, बांबूवर आधारित रोजगार, आदिवासी शेतकऱ्यांना अनुदान, शेतीविषयक योजना राबविणे, सोलर सुविधा आदींना प्राधान्य आहे.

टॅग्स :Governmentसरकार