शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतरमध्ये काश्मीरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हटला...
2
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
3
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
4
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
6
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
7
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
8
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
9
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
10
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
11
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
13
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
14
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
15
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
16
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
17
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
18
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
19
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
20
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान

पाटलांचा एकतर्फी विजय

By admin | Updated: February 7, 2017 00:05 IST

निकालसाठी किमान मंगळवार उजाडेल, अशी अपेक्षा असतानाच रणजित पाटलांना पहिल्याच फेरीपासून आघाडी घेतली.

७८ हजार ५१ मते : पहिल्या फेरीपासूनच मतांची आघाडी मुख्यमंत्र्यांचे सारथी म्हणून काम करेनपदवीधर मतदारसंघातून विजयाची जोरदार मुसंडी मारल्यानंतर रणजित पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी आणि मतदारांचा विश्वास हेच यशाचे गमक मानले. येत्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाचे पालन करेन. पक्ष संघटनात्मक अथवा कोणतेही कामे मुख्यमंत्र्यांनी सोपविल्यास त्यांचे सारथी म्हणून पुढे नेईल. प्रज्ञावंतांनी भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. पदवीधर निवडणूक ही आरसा होती. मात्र मुख्यमंत्री, पंतप्रधानांवर मतदारांनी विश्वास दर्शविला, असे रणजित पाटील म्हणाले. अमरावती : निकालसाठी किमान मंगळवार उजाडेल, अशी अपेक्षा असतानाच रणजित पाटलांना पहिल्याच फेरीपासून आघाडी घेतली. त्यांनी एकतर्फी विजय मिळवून प्रतिस्पर्धांना नमविले. पहिल्या फेरीत कोणीही मतांचा कोटा पूर्ण करू शकणार नाही, ही उत्कंठा होती. मात्र, पाटलांनी ७८ हजार ५१ मते प्राप्त करून राजकीय धुरिणांचे सगळे अंदाज फोल ठरविले.येथील विभागीय क्रीडा संकुलात सोमवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली. पहिल्या टप्प्यात मतपत्रिका सरमिसळ करण्यात आल्यात. व हजार मतांचे गठ्ठे तयार करण्यात आले. ते ३० टेबलवर मोजण्यात आले. यामध्ये रणजित पाटील यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेत ती सहाव्या फेरीपर्यंत कायम ठेवली. पदवीधर निवडणुकीत १,३३,५८७ मतदारांनी हक्क बजावला होता. या निवडणुकीत १३ उमेदवार ंिरंगणात होते. त्यामुळे पहिल्या फेरीत विजयासाठी ६१, ६८१ एवढ्या मतांचा कोटा कोणीही उमेदवार पूर्ण करु शकणार नाही, असा ‘राजकीय’ अंदाज निवडणुकीनंतर बांधल्या गेला. चवथ्या फेरीत झाली विजयाची निश्चितीअमरावती : मात्र, रणजित पाटील यांनी पहिल्या ते सहाव्या फेरीपर्यत आघाडी घेत विजयाचा रथ कायम ठेवला. काँग्रेसचे संजय खोडके यांच्यासह अन्य १२ उमेदवारांना मतांची आघाडी घेण्यासाठी संधी पाटलांनी शेवटपर्यंत दिली नाही, हे विशेष!. तिसऱ्या फेरीत पाटलांनी ५४ हजार ९२५ मते प्राप्त केल्याने आता विजय नक्कीच होणार, हे स्पष्ट झाले होते. मात्र अमरावती जिल्ह्याची मतमोजणी शेवटी असल्याने काही वेगळे होईल काय? ही चिंता स्वत: रणजित पाटलांना होती. ही भावना त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. एकदा मतमोजणी होऊ द्या, त्यानंतरच विजयाबाबतची प्रतिक्रिया देईल, असे म्हणत पाटलांनी वेळ मारुन नेली. परंतु चवथ्या फेरीनंतर पाटलांच्या खात्यात ७१ हजार ६ मते गोळा होताच त्यांचा विजय निश्चित झाला. पाचव्या फेरीनंतर ७७, ८५४ मते त्यांनी प्राप्त केली. केवळ औपचारिता म्हणून सहाव्या फेरीची मतमोजणी झाली. सहाव्या फेरीत १८७ मते घेवून पाटलांनी एकुण ७८ हजार ५१ मते घेण्याचा विक्रम नोंदविला. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत पहिल्या पसंती क्रमांकाचे मते प्राप्त करुन विजय संपादन केल्याची नोंद रणजित पाटलांनी दुसऱ्यांदा केली आहे. यापूर्वी बी. टी. देशमुख यांनी पहिल्या पसंती क्रमांकाची मते घेवून विजयी मिळविला होता. पहिल्या फेरीतच विजयी मतांचा कोटा पूर्ण करण्यात आल्याने दुसऱ्या पसंती क्रमांकासाठी मतमोजणीची गरज नाही, अशी घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी जे. पी. गुप्ता यांनी केली. ही माहिती आयोगाला कळविल्यानंतर व त्यांच्या परवानगीनंतर अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातून विजयी झाल्याचे प्रमाणपत्र रणजित पाटलांना बहाल करण्यात आले. यावेळी मुख्य निवडणूक निरिक्षक तथा राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख मतमोजणी प्रक्रियेदरम्यान पूर्णवेळ उपस्थित होते. पाटील, पोटे अन् खोडके यांच्यात रंगला पानाचा विडारणजित पाटील यांचा विजय निश्चित झाला असताना काँग्रेसचे संजय खोडके व रणजित पाटील हे निवडणुकीच्या गप्पांमध्ये रंमले. पदवीधर निवडणुकीत गत दोन महिन्यात झालेल्या घडमोडींवर चर्चा सुरु होती. याचवेळी पालकमंत्री प्रवीण पोटे हे देखील दाखल झाले. दरम्यान खोडकेंसाठी आणलेले पानाचे विडे त्यांनी ना. पोटे व पाटील यांनाही दिले. त्यानंतर यांच्यात ‘राजकीय’ पानाचा विडा रंगला, हे विशेष.पाणी झिरपल्याने २०० मतपत्रिका भिजल्याविभागीय क्रीडा संकुलातील स्ट्राँग रुममध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आलेल्या मतपेट्यांवर पाणी झिरपले. परिणामी २०० मतपत्रिका भिजल्या होत्या. मतपेट्या उघडताना ही बाब सकाळी ८ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास प्रशासनाचा लक्षात आली. त्यानंतर मतमोजणी परिसरातील भिजलेल्या मतपत्रिका टेबलवर वाळविण्यात आल्यात. ही बाब उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर प्रशासनाने स्पष्ट केली.महत्त्वाची खाती सांभाळण्याचा रणजित पाटलांचा अनुभव आहे. शिक्षकांच्या समस्या सोडविणे, रोजगार मेळावे आदींमुळे पहिल्याच फेरीत विजयी होतील, असा आत्मविश्वास होता. पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अपार परिश्रम घेतले ते फळाला आले. - प्रवीण पोटे, पालकमंत्री, अमरावती