शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेत ‘सहकार’ची एकहाती सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2021 05:00 IST

परिवर्तन पॅनलला चार संचालकांच्या विजयावर समाधान मानावे लागले, तर अचलपूर तालुका सेवा सहकारी सोसायटीमधून आनंद काळे यांनी अपक्ष म्हणून बाजी मारली.  यापूर्वी चार संचालक अविरोध निवडून आले आहेत, हे विशेष.   स्थानिक गाडगेनगर स्थित संत गाडगेबाबा समाधी मंदिर सभागृहात मंगळवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ झाला. सर्वप्रथम राज्यमंत्री बच्चू कडू यांनी चांदूर बाजार तालुका सेवा सहकारी सोसायटीमधून २१ मते प्राप्त करून विजय मिळविल्याचे घोषित करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  पालकमंत्री ना. यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात  आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचे १३ संचालक निवडून आल्याने, बँकेवर ‘सहकार’चीच एकहाती सत्ता असेल, हे आता निकालानंतर स्पष्ट झाले आहे. परिवर्तन पॅनलला चार संचालकांच्या विजयावर समाधान मानावे लागले, तर अचलपूर तालुका सेवा सहकारी सोसायटीमधून आनंद काळे यांनी अपक्ष म्हणून बाजी मारली.  यापूर्वी चार संचालक अविरोध निवडून आले आहेत, हे विशेष.   स्थानिक गाडगेनगर स्थित संत गाडगेबाबा समाधी मंदिर सभागृहात मंगळवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ झाला. सर्वप्रथम राज्यमंत्री बच्चू कडू यांनी चांदूर बाजार तालुका सेवा सहकारी सोसायटीमधून २१ मते प्राप्त करून विजय मिळविल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर, टप्प्याटप्प्याने उमेदवारांच्या विजयांची मालिका सुरू होती. सर्वात शेवटी महिला आरक्षित प्रवर्गाची मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. १७ संचालकांच्या निवडीसाठी ४८ उमेदवार रिंगणात कायम होते. त्यापैकी ३१ उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. १,६८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यापूर्वी चार संचालक अविरोध निवडून आले आहेत. 

दाेन आमदारांचा धक्कादायक पराभवअकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे आणि मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला आहे. दर्यापूर तालुका सेवा सहकारी सोसायटीमधून आमदार प्रकाश भारसाकळे यांना त्यांचे धाकटे बंधू सुधाकर भारसाकळे यांनी धोबीपछाड दिली, तर मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांचा अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातून आमदार बळवंत वानखडे यांनी पराभव केला.

आ. पटेल कोर्टात जिंकले, मैदानात हरलेमेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या नामनिर्देशनावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर, आ.पटेल यांनी कोर्टात धाव घेतली असता, त्यांचे नामनिर्देशन न्यायालयाने कायम ठेवण्याचा निर्णय दिला होता.  आमदार राजकुमार पटेल यांनी अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातून निवडणूक लढविली. मात्र, त्यांना मैदानात पराभव स्वीकारावा लागला. आमदार बळवंत वानखडे हे मोठ्या फरकाने विजयी झाले. 

हे ठरले ‘गेमचेंजर’जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ‘सहकार’ पॅनलची सत्ता पुन्हा आणण्यासाठी रणनीती आखणे, मतदारांशी थेट संपर्क आणि वैचारिक बांधीलकी जोपासण्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. बँकेच्या कारभारावर आरोप, प्रत्यारोप होत असतानाही संयम बाळगला आणि ‘सहकार’ला एकहाती सत्ता मिळवून देण्यासाठी ना.यशोमती ठाकूर, बबलू देशमुख हे खऱ्या अर्थाने ‘गेमचेंजर’ ठरले.

मतमोजणीस्थळी सकाळपासूनच गर्दीजिल्हा बँक निवडणूक मतमोजणीच्या अनुषंगाने उमेदवारांचे समर्थक, चाहत्यांनी मंगळवारी मतमोजणीस्थळी सकाळपासूनच गर्दी केली होती. पोलिसांचाही तगडा बंदोबस्त होता. मतमोजणीस्थळी ओळखपत्र असलेल्यांनाच प्रवेश देण्यात आला. मात्र, गाडगेनगर हा परतवाडा-दर्यापूरकडे ये-जा करणारा प्रमुख मार्ग असल्याने, बरेचदा गर्दीमुळे वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले. दरम्यान, पोलिसांची दमछाकही झाली. 

 

टॅग्स :bankबँकYashomati Thakurयशोमती ठाकूर