शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

चिंचोलीची ‘कपिला’ लाखात एक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 23:06 IST

चिंचोलीची ‘कपिला’ दररोज पान्हावते. २७ वर्षांपासून ती दूध देत आहे. या काळात हरतºहेचे प्रयत्न करूनही तिची गर्भधारणा होऊ शकली नाही. कोट्यवधीत एक अशा या गायीमुळे तिचे मालक लुनकरण गोपीलाल गांधी आणि त्यांचे गाव चिंचोली हे चर्चेचा विषय ठरले आहेत.

ठळक मुद्दे२७ वर्षांपासून दररोज पान्हा । गर्भधारणा एकदाही नाहीसंडे हटके बातमी

चेतन घोगरे ।लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : चिंचोलीची ‘कपिला’ दररोज पान्हावते. २७ वर्षांपासून ती दूध देत आहे. या काळात हरतºहेचे प्रयत्न करूनही तिची गर्भधारणा होऊ शकली नाही. कोट्यवधीत एक अशा या गायीमुळे तिचे मालक लुनकरण गोपीलाल गांधी आणि त्यांचे गाव चिंचोली हे चर्चेचा विषय ठरले आहेत.लुनकरण गांधी यांंच्या गुरांच्या गोठ्यात त्यांच्याच घरातील एका गाईने १९८७ मध्ये एक गोंडस पिलाला जन्म दिला. तिचे नाव कपिला ठेवण्यात आले. या गावरान जातीच्या कपिलाला पाच वर्षांची असताना सर्वप्रथम भरण्यासाठी गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात ु खाजगी डॉक्टरांना दाखवण्यात आले. पण, तिला तेव्हापासून गर्भ राहिलेला नाही तो आतापर्यंत. गांधी कुटुंबीयांकडून तिला गावातीलच रमेश पाठक या व्यक्तीने गर्भधारणा होण्यासाठी औषध असल्याचे सांगून नेले. तथापि, कपिलाला गर्भधारणा होत नसल्याचे पाहून अखेर रमेश पाठक यांनी ती विक्रीला काढली. लुनकरण गांधी यांना माहिती मिळताच ५०० रुपये व दुसऱ्या गाईचे वासरू देऊन त्यांनी ती परत मिळविली.दरम्यान, गांधी कुटुंबाकडे परत येताच कपिलाला आपोआप पान्हा फुटला. लुनकरण गांधी यांनी स्वत: दूध काढण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम दीड लिटर चिकाचे दूध देऊन नंतर काही दिवसांत चांगले दूध देण्यास सुरुवात केली. तथापि, वांझ गाईचे दूध योग्य की अयोग्य, या पेचामुळे ते गुरांच्या रक्षणासाठी पाळलेल्या कुत्र्यांना दिले जात असे. २०१० मध्ये गांधी यांची मुलगी गीताबाई कलंत्री (रा. आमगाव) यांनी मथुरा येथील गोरक्षणाला भेट देऊन गाईची कहाणी सांगितली. संचलकांनी ही गाय स्वखर्चाने मथुरेला आणण्याची इच्छा व्यक्त केली तसेच दूध व गोमूत्र आरोग्यदायी असल्याचा हवाला दिला. यानंतर कपिलाच्या दुधाचे गांधी कुटुंबीयांत सेवन सुरू झाले.अशा गार्इंची इतिहासात नोंदगर्भधारणा न राहता दूध देणारी गाय यापूर्वी गजानन महाराज देवस्थान (शेगाव) व परशराम महाराज (पिंपळोद) यांच्याकडे त्या काळात असल्याची इतिहासात नोंद आहे.हार्मोनल इम्बॅलन्समुळे ही गाय नेहमी दूध देते. अशा स्थितीत गाईच्या गर्भधारणेचा व दुधाचा काही एक संबंध नसतो. अशा गाय लाखांत एखादी असते.- पी.एन. ठाकूर, पशुधन विकास अधिकारी, अंजनगाव सुर्जी