शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकासासाठी शंभर टक्के निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:30 IST

अमरावती : राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी राज्य शासनाने राजकोषीय उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीने २०२०-२१ या ...

अमरावती : राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी राज्य शासनाने राजकोषीय उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीने २०२०-२१ या वर्षासाठी मंजूर केलेल्या नियत व्ययासाठी १०० टक्के निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेला आता नवीन कामांचे नियोजन करता येणार असून, गतवर्षाच्या दायित्वालाही निधी मिळणार आहे. यामुळे जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

राज्य शासनाने राजकोषीय उपाययोजना जाहीर करताना सर्व विभागांना ७५ टक्के निधी मंजूर करण्याचा निर्णय १० नोव्हेंबरच्या शासननिर्णयाद्वारे घेतला होता. त्यामध्ये मोठी संदिग्धता होती. जिल्हा परिषदेला नेमका किती टक्के निधी मिळेल, याचा बोध त्या निर्णयात होत नव्हता. यासाठी जिल्हा परिषदेकडे जिल्हा नियोजन अधिकार्‍यांकडे वारंवार विचारणा होत होती. त्यांनाही याबाबत स्पष्टता होत नव्हती. यामुळे नियोजन विभागाकडून मार्गदर्शन मागवले होते. यामुळे वित्त विभागाच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी शुद्धीपत्रक आधारे आता जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेला १०० टक्के निधी वितरित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निधीतून दायित्वाची रक्कम वजा जाता उर्वरित निधीतून नियोजन करता येणार आहे. सरकारने जिल्हा नियोजन समितीबरोबरच आमदारांच्या स्थानिक विकास निधीसाठीही शंभर टक्के निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता विधानसभा मतदारसंघांमध्ये ही कामे करता येणार आहेत. कोरोना संकटामुळे शासनाने निधीमध्ये ६७ टक्के कपात केल्यामुळे सर्व शासकीय योजनांची कामे बंद होती. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ही कामे पुन्हा सुरू होणार आहे. ही कामे करताना रोजगार निर्मिती व मत्ता निर्मितीला प्राधान्य देण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत.

कोट

सरकारने जिल्हा परिषदेला १०० टक्के निधी देण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागातील विकासकामांना चालना मिळणार आहे. सर्वसाधारण सभा झाल्यानंतर नवीन कामांच्या नियोजनाला प्राधान्य दिले जाणार असून, प्रशासनाला तसे निर्देश दिले आहेत. पालकमंत्र्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी मिळविण्याचा प्रयत्न आहे.

- बबलू देशमुख, अध्यक्ष, जिल्हा परिषद