शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

शंभर फूट उंच तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 06:00 IST

बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवि राणा, माजी राज्यमंत्री सुनील देशमुख, मध्य रेल्वेचे भुसावळ विभागाचे प्रबंधक विवेककुमार गुप्ता, सिनिअर डिव्हीजन कमांडंट अजय दुबे, सिनिअर डीओएम स्वप्निल निला, डीईएन आर.पी. चव्हाण, डीसीएम अरुणकुमार, डीईई जनरल जी.एस. लखेरा, जयंत वानखडे, जितू दुधाणे, संजय हिंगासपुरे, आशिष गावंडे यांच्यासह इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला होती.

ठळक मुद्देअमरावती रेल्वे स्थानक : खासदारांकडून ध्वजारोहण, आरपीएफची सलामी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील अमरावती मॉडेल रेल्वे स्टेशन परिसरात गुरुवारी शंभर फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर तिरंगा फडकविण्यात आला. यावेळी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) चे १२ जवान व एक उपनिरीक्षक यांच्या पथकाने राष्ट्रगीतानंतर राष्ट्रध्वजाला सलामी दिली. याप्रसंगी भुसावळ आरपीएफचे बँड पथक हे विशेष आकर्षण ठरले.बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवि राणा, माजी राज्यमंत्री सुनील देशमुख, मध्य रेल्वेचे भुसावळ विभागाचे प्रबंधक विवेककुमार गुप्ता, सिनिअर डिव्हीजन कमांडंट अजय दुबे, सिनिअर डीओएम स्वप्निल निला, डीईएन आर.पी. चव्हाण, डीसीएम अरुणकुमार, डीईई जनरल जी.एस. लखेरा, जयंत वानखडे, जितू दुधाणे, संजय हिंगासपुरे, आशिष गावंडे यांच्यासह इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला होती.२० फूट उंची, ३० फूट लांबी असलेला राष्ट्रीय ध्वज खास रेल्वेने तयार करून घेतला आहे. १०० फूट उंच असलेल्या ध्वजस्तंभावर सदर ध्वज फडकत आहे. सदर झेंडा कायमस्वरूपी असून, रेल्वे स्थानक परिसरात फडकत राहणार आहे, हे विशेष! दुपारी ४ वाजताच्या सुमारास पार पडलेल्या या कार्यक्रमात परेड करून राष्ट्रध्वजाला सन्मापूर्वक सलामी दिली. त्या आरपीएफ पथकाचे नेतृत्व उपनिरीक्षक एच.एम. शहा यांनी केले. त्यांना वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त अजय प्रकाश दुबे व निरीक्षक पी.के. भाकर यांचे मार्गदर्शन लाभले. या पथकात १२ सशस्त्र जवानांचा समावेश होता, तर भुसावळवरून खास अंबानगरीत आलेल्या आरपीएफच्या बँड पथकाचे नेतृत्व एस. बी. खोसे यांनी केले. ध्वाजारोहणानंतर खासदार नवनीत राणा यांनी रेल्वेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले. मॉडेल रेल्वेस्टेशनवर तिरंगा फडकत राहणे हे अमरावतीसाठी गौरवास्पद असून ते वैभव असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान रेल्वेस्थानक परिसरातच सांडपाणी पुर्नवापर प्रकल्पाची पायाभरणी देखील खासदारांच्या हस्ते करण्यात आली.तिरंगा ध्वज असलेले अमरावती दुसरे स्थानकआतापर्यंत देशातील ७० रेल्वे स्थानकांवर राष्ट्रध्वज फडकत आहे. भुसावळ रेल्वे विभागामध्ये अमरावती हे दुसरे रेल्वे स्थानक आहे, जेथे १०० फुटांवर राष्ट्रध्वज फडकला आहे. यानंतर नाशिक व खंडवा या स्थानकांवर लवकरच तिरंगा हवेत झेपावेल, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी‘ लोकमत’शी बोलताना सांगितले.