शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भात दर नऊ तासांत एक शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 10:11 IST

Amravati News अस्मानी व सुल्तानी संकटामुळे पश्चिम विदर्भात यंदा जूनअखेर ४६१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. मागील वर्षी याच कालावधीत ५०० शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या.

ठळक मुद्देसहा महिन्यांत ४६१ शेतकऱ्यांनी कवटाळला मृत्यू

गजानन मोहोड

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : कोरोनाकाळातही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. अस्मानी व सुल्तानी संकटामुळे पश्चिम विदर्भात यंदा जूनअखेर ४६१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. मागील वर्षी याच कालावधीत ५०० शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. यंदा प्रमाण थोडे घटले असले तरी दर दोन दिवसांत पाच व दर नऊ तासांत एक शेतकरी आत्महत्या होत आहे.

कर्ज, नापिकी, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ यामध्ये वऱ्हाडातील शेतकरी अडकला आहे. मुला-मुलींचे शिक्षण, लग्न व घर संसार कसा करावा, या चिंतेने शेतकऱ्यांना नैराश्य येत आहे. खासगी सावकारांचे कर्ज वाढत आहे. शेतीमध्ये उत्पादन खर्चही पदरी पडत नाही. जिल्हा समितीची सहा-सहा महिने बैठक होत नसल्याने प्रशासनाचीही अनास्था दिसून येत आहे.

राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती विभागात होत आहेत. शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यांमध्ये शासनाद्वारे अनेक योजना प्राधान्याने राबविण्यात येतात. मात्र, खऱ्या व गरजू शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचत नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

 

२००१ पासून १६,८४८ आत्महत्या

विभागात १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद महसूल विभागाद्वारे घेण्यात येते. त्यानुसार आतापर्यंत १६ हजार ८४८ शेतकरी आत्महत्या झाल्या. यामध्ये ७,५६५ प्रकरणात वारसांना शासन मदत देण्यात आली. ८,९७३ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली, तर ३९० प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

 

 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या