शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात भूमकानंतर मध्य प्रदेशातील बोगस डॉक्टरच्या उपचाराने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:10 IST

फोटो - खंडूखेडा येथे मध्यप्रदेशचा बोगस डॉक्टर बेले उपचार करताना. --------------------------------------------------------------------------------------------------------------- कोरोनाच्या नावावर आदिवासी पाड्यात धूम, तालुका प्रशासनासह बैतूल ...

फोटो - खंडूखेडा येथे मध्यप्रदेशचा बोगस डॉक्टर बेले उपचार करताना.

---------------------------------------------------------------------------------------------------------------

कोरोनाच्या नावावर आदिवासी पाड्यात धूम, तालुका प्रशासनासह बैतूल जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

लोकमत विशेष

नरेंद्र जावरे - चिखलदरा ( अमरावती) : मध्य प्रदेश सीमारेषेवर वसलेल्या मेळघाटात कोरोनाच्या नावावर बोगस डॉक्टरने उपचार केला. त्यात खंडुखेडा येथील एका आदिवासीचा मृत्यू झाला. काटकुंभ आरोग्य केंद्रातील पथक उपचाराकरिता गेले तेव्हा सोमवारी सायंकाळी त्या बोगस डॉक्टरने गावातून धूम ठोकली. यासंदर्भात तालुका प्रशासनासह बैतुल (मध्यप्रदेश) जिल्हाधिकार्‍यांना तक्रार करण्यात आली आहे. गत आठवड्यात सेमाडोह येथील एका कोरोनाग्रस्त महिलेचा भूमकाच्या उपचाराने मृत्यू झाला. त्यानंतर ही धक्कादायक घटना उजेडात आली आहे.

मध्यप्रदेशच्या खामला (ता. भैसदेही) येथील राहुल बेले असे बोगस डॉक्टरचे नाव आहे. त्याच्या उपचाराने खंडुखेडा येथील सावजी काल्या चिमोटे (५०) या इसमाचा मृत्यू झाला. बोगस डॉक्टरने त्याच्यावर जुजबी उपचार केले. मात्र, प्रकृती खूपजास्त खालावल्याने भैसदेही येथे पाठवून दिले. त्यात त्याचा मृत्यू झाला. मेळघाटातील काटकुंभ, चुरणी, हतरू, जारिदासह जवळपास ४० खेडी मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्यातील भैसदेही तालुक्याच्या सीमारेषेवर आहेत. त्यामुळे आदिवासींचे सर्वाधिक व्यवहार मध्य प्रदेशात होतात. काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राशी संलग्न खंडुखेडा येथे रविवारी कोविड लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी आदित्य पाटील, डॉ. मनोज जाणे, रोशन आठवले, आरोग्य कर्मचारी झाकर्डे, तायडे, आशा, अंगणवाडी सेविका असे पथक गेले होते. मात्र, कोणीच येत नसल्याचे पाहून हे पथक घरोघरी गेले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेक घरांत सलाईन टांगलेल्या होत्या, तर रुग्ण बिछान्यावर होते. बोगस डॉक्टर राहुल बेले एका घरात बसलेला दिसला. पथकाने विचारपूस केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पथकाने त्याला पिटाळून लावण्यात आले.

बॉक्स

बैतूल जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

वैद्यकीय नियमानुसार, एका राज्यातील डॉक्टर दुसऱ्या राज्यात येऊन एकदम उपचार करू शकत नाही. परंतु, बोगस डॉक्टरच्या या उपचार पद्धतीने एकाचा मृत्यू झाला. त्या संदर्भातील तक्रार काटकुंभचे वैद्यकीय अधिकारी आदित्य पाटील व आरोग्य समन्वयक रोशन आठवले यांनी बैतुल जिल्हाधिकारी, भैसदेही उपविभागीय अधिकारी व चिखलदरा तहसीलदार तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी यांना केली.

बॉक्स

खंडुखेड्यात १७ पॉझिटिव्ह रुग्ण

मेळघाटातील आदिवासी पाड्यांमध्ये झपाट्याने कोरोनाची लागण होत आहे. काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकूण ७८ कोरोना पॉझिटिव्ह आहेत. यापैकी डोमा येथे १८ व खंडुखेड्यात १७ रुग्ण आहेत.

कोट

खंडुखेडा येथे मध्य प्रदेशच्या खामला येथील बोगस डॉक्टर उपचार करताना आढळून आला. त्याने उपचार केलेल्यांपैकी एका इसमाचा मृत्यू झाला. त्याच्याकडे कुठलेच प्रमाणपत्र नव्हते. त्यासंदर्भातील तक्रार तालुका प्रशासन व बैतूल जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

- आदित्य पाटील, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, काटकुंभ