शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

एक दिवसाआड बालमृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 22:19 IST

जिल्हा स्त्री रुग्णालयात एक दिवसाआड एक बालमृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती वर्षअखेर आकडेवारीवरून उघड होत आहे. ३६० दिवसांत २३५ बाळांचे मृत्यू झाले असून, ६ मातामृत्यू झाले आहेत. गेल्या वर्षातील मार्च २०१७ ते एप्रिल २०१८ पर्यंत २७१ बालमृत्यू झाले होते, तर ६ माता मृत्यू झाले होते. त्या तुलनेत यंदा बालमृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे आढळून येत आहे.

ठळक मुद्देडफरीन रुग्णालयाची नोंद : ३६० दिवसांत २३५ बाळांच्या मृत्यूची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयात एक दिवसाआड एक बालमृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती वर्षअखेर आकडेवारीवरून उघड होत आहे. ३६० दिवसांत २३५ बाळांचे मृत्यू झाले असून, ६ मातामृत्यू झाले आहेत. गेल्या वर्षातील मार्च २०१७ ते एप्रिल २०१८ पर्यंत २७१ बालमृत्यू झाले होते, तर ६ माता मृत्यू झाले होते. त्या तुलनेत यंदा बालमृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे आढळून येत आहे.जिल्ह्यासह परराज्यातील गोरगरिब महिलांच्या प्रसूती उपचाराचा डोलारा सांभाळणाऱ्या जिल्हा स्त्री रुग्णालयात दरवर्षी ५० हजारांवर रुग्णांचे उपचार केले जाते. एप्रिल ते नोव्हेंबर २०१८ पर्यंत डफरीन रुग्णालयात ओपीडी कक्षात २५,२२० रुग्ण उपचारासाठी आले होते. १८,०६९ महिला रुग्णांना दाखल करण्यात आले. यामध्ये ६,२५२ महिलांचे नॉर्मल प्रसूती झाली. ३,६०० महिलांचे सिझेरीयन करण्यात आले. ५,४३१ मुले, तर ५,२४१ मुलींचा जन्म झाला आहे. यामध्ये मुलींची संख्या १९० ने कमीच असल्याचे दिसून येत आहे. या वर्षातील जानेवारी महिन्यात २७ बाळांचे मृत्यू झाले. फेब्रुवारीत २२, मार्च १५, एप्रिल १८, मे १९, जून ३१, जुलैत १७ बाळांचे, तर तीन मातामृत्यू, आॅगस्टमध्ये १७ बाळ व एक माता मृत्यू, सप्टेंबरमध्ये २६ बाळांचे मृत्यू, आॅक्टोबरमध्ये १९, तर नोव्हेंबरमध्ये १८ बाळांचे मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.यामुळे होतात मृत्यूग्रामीण व दुर्गम भागातून येणाऱ्या महिलांना गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले जाते. मात्र, उपचारासाठी आणताना विलंब होत असल्यामुळे महिलांचे किंवा बाळांचे मृत्यू होतात. याशिवाय कमी वजनाचे बाळ, वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळांचे अधिक मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे आरोपडफरीनमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या महिलांचे किंवा बाळांचे मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक डॉक्टरांवर हलगर्जीपणांचे आरोप करतात. अनेकदा पोलिसांत तक्रारीसुद्धा झाल्या आहेत. मात्र, आजपर्यंत या आरोपात कोणतेही तत्थे उघड झाली नाहीत.१ हजार २८ कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाएप्रिल ते नोव्हेंबर २०१८ दरम्यान जिल्हा स्त्री रुग्णालयात १ हजार २८ महिलांवर कुटुंब नियोजनांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. गेल्या वर्षातील एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ पर्यंत १ हजार ५१० महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या.