मृतदेहाचा दफनविधी : हल्लेखोराच्या अटकेची मागणीअचलपूर : जुन्या वादातून सोमवारी उद्भवलेल्या भांडणातून चार हल्लेखोरांनी एकाला ठार केले तर दुसऱ्याला गंभीर जखमी केले. ही घटना येथील बियाबानी भागात घडली होती. चार हल्लेखोरांपैकी एकाला पोलिसांनी अटक केली असून तीन जण अजूनही फरार आहेत. अचलपूर येथील बियाबानी भागातील रहिवासी असलेले शे. अश्फाक शे. इस्माल (३५) व सय्यद जुबेर सय्यद अय्युब यांनी सोमवार ३० मे रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आपला ट्रक क्रमांक एम. एच. ३६ एफ. ०३५८ गाडी लॉनजवळ उभा केला असता शे. इरफान शे. इस्माईल याने अश्लील शिवीगाळ करून तेथून ट्रक हटविण्यास सांगितले. यावरून वादाला सुरूवात झाली. त्यानंतर सय्यद जुबेर व त्याचा मामेभाऊ शेख इलियास ऊर्फ अश्फाक रात्री आठ वाजेच्या सुमारास शरबत प्यायला गेले तेथे परत येत असताना शेख इरफान शे. इस्माईल, इरफानखान इस्माईखान, शे. इरशाद शे. इस्माईल, शे. एजाज शे. बाबू यांनी वस्तरा, गुप्तीने त्यांचेवर हल्ला चढविला. यात शे. अश्फाक व सय्यद जुबेर गंभीर जखमी झाले. या दोघांना आजूबाजूच्या लोकांनी उपजिल्हा रुग्णालयात आणले असता शे. अश्फाकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर जुबेर याचेवर उपचार सुरू आहेत. शे. अश्फाक याचे मृतदेहाचे आज दुपारी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांचे पश्चात पत्नी, दोन वर्षाचा मुलगा, आई, वडील, दोन भाऊ, तीन बहिणी असा आप्त परिवार आहे. (शहर प्रतिनिधी)हल्ल्यातील तिघे फरारहल्ला झाल्यानंतर इरफान खान पोलीस स्टेशनला आला असता अश्फाक ठार झाल्याची कुणकुण त्याला लागताच तो पळून जात असताना पोलिसांनी तेथेच परिसरात त्याला पकडून अटक केली. शेख इरफान, शेख इरशाद, शेख एजाज हे हल्ला होऊन १८ तास उलटले. मात्र अद्यापही पोलीस त्यांना अटक करू शकले नाहीत.शे. अश्फाक याचे नातेवाईक मुक्ती नुरोद्दीन, मृताचा भाऊ शे. इसार ऊर्फ बाबू, जावई मो. साजीद आदींनी ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांची मंगळवारी भेट घेऊन हल्लेखोरांना त्वरित अटक करण्याची मागणी केली. सोमवारी रात्री जुन्या वैमनस्यावरून हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एक ठार व दुसरा गंभीर जखमी झाला. यातील तीन हल्लेखोर फरार आहेत. - नरेंद्र ठाकरे, ठाणेदार, पोलीस ठाणे अचलपूर
अश्फाक खून प्रकरणात एकाला अटक, तीन फरार
By admin | Updated: June 1, 2016 00:53 IST