शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी दीड हजार कोटींचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 05:00 IST

कमंत्री ठाकूर म्हणाल्या,  कर्ज वितरण प्रक्रिया सुलभ असावी. शेतकरी बांधवांची अडवणूक होता कामा नये. बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता बाळगून कामे करावी व कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. खरीप हंगामात बियाणे निविष्ठा व इतर कामांसाठी शेतकरी बांधवांना पीक कर्ज वेळेत मिळणे आवश्यक आहे. पीक कर्जासाठी बँकेत येणाऱ्या शेतकरी बांधवांना संपूर्ण माहिती द्यावी. आवश्यक कागदपत्रांची यादी यापूर्वीच प्रशासनाने दिली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांप्रति संवेदना बाळगा, पालकमंत्र्यांकडून पीक कर्ज आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  खरीप हंगाम तोंडावर असताना पीक कर्ज वितरण गतीने होणे आवश्यक आहे. यंदा खरीपासाठी दीड हजार कोटींचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ते पूर्ण व्हावे, यादृष्टीने वेगाने कर्ज वितरण करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी खरीप कर्ज वितरणाचा आढावा बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे, आमदार प्रताप अडसड, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, अग्रणी बँक व्यवस्थापक एल.के. झा आदी उपस्थित होते.पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या,  कर्ज वितरण प्रक्रिया सुलभ असावी. शेतकरी बांधवांची अडवणूक होता कामा नये. बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता बाळगून कामे करावी व कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. खरीप हंगामात बियाणे निविष्ठा व इतर कामांसाठी शेतकरी बांधवांना पीक कर्ज वेळेत मिळणे आवश्यक आहे. पीक कर्जासाठी बँकेत येणाऱ्या शेतकरी बांधवांना संपूर्ण माहिती द्यावी. आवश्यक कागदपत्रांची यादी यापूर्वीच प्रशासनाने दिली आहे. त्याव्यतिरिक्त अनावश्यक कागदपत्रे मागू नये. शेतकरी बांधवांची अनावश्यकरीत्या अडवणूक केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. 

शेतकऱ्यांना निधींचे वितरण वेळेत करा

विविध योजनांचा निधी बँकाच्या माध्यमातून लाभार्थींपर्यंत पोहचवला जातो. त्याचे वितरण वेळेत झाले पाहिजे. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचे पैसे बँकेत येतात, पण ते शेतकरी बांधवांना वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. असे यापुढे कधीही घडता कामा नये, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. 

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरCrop Loanपीक कर्ज