शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

दीड लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी

By admin | Updated: June 7, 2017 00:16 IST

सलगचा दुष्काळ, नापिकी व शेतमालास हमीपेक्षा कमी भाव यामुळे जिल्ह्यातील एक लाखाचे आतील कर्ज असलेला दोन लाख चार हजार ४३९ शेतकरी विविध बँकांचे थकबाकीदार झाले आहेत.

जिल्ह्याची स्थिती : एक लाखाच्या आतील १,५७५ कोटींचे कर्ज थकीतलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सलगचा दुष्काळ, नापिकी व शेतमालास हमीपेक्षा कमी भाव यामुळे जिल्ह्यातील एक लाखाचे आतील कर्ज असलेला दोन लाख चार हजार ४३९ शेतकरी विविध बँकांचे थकबाकीदार झाले आहेत. या शेतकऱ्यांकडे १,५७५ कोटी रुपये थकीत आहेत. यापैकी दीड लाख शेतकऱ्यांचे किमान १२०० कोटी रूपयांचे कर्ज शासन निर्णयामुळे माफ होण्याची शक्यता आहे.यापूर्वी जिल्ह्यात सन २०१५-१५ व २०१५-१६ या दोन्ही वर्षी दुष्काळ पडला होता. पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्याने शासनाने थकीत कर्जाचे सलग पाच किस्तीमध्ये पुनर्गठन केले होते. शेतकऱ्यांना खरिपासाठी नव्याने कर्ज दिले होते. मागील वर्षीच्या हंगामात पाऊस समाधानकारक झाल्याने पीक चांगले झाले. मात्र शेतमालाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चदेखील निघाला नाही. त्यामुळे यंदा शेतकरी थकीत कर्जाचा भरणा करू शकले नाही. शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत असल्याने सातबारा कोरा करावा, ही मागणी जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांनी शासनाकडे मागील चार महिन्यांपासून लावून धरली आहे एक जूनपासून शेतकरी संपावर गेला. शासन मोठ्या अडचणीत आले असताना शनिवारी शासनाने पाच एकरांच्या आतील शेतकऱ्यांचे म्हणजेच अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० जून २०१६ च्या आतील एक लाखांपर्यंतची कर्ज माफ होणार असल्याची चर्चा सध्या शासनस्तरावर सुरू आहे. जिल्ह्यात गतवर्षी ३० जूनपर्यंत दीड लाखांच्या आतील एक लाख ७१ हजार ५६५ शेतकऱ्यांकडे १,३९८ कोटी रुपये थकीत होते. यापैकी किमान दीड लाख शेतकऱ्यांचे बाराशे कोटी रूपयांचे कर्ज माफ होण्याची शक्यता आहे.३० जून २०१६ पर्यंत थकीत बँकनिहाय शेतकरीजिल्हा बँकेकडे ५० हजारांच्या आतील २३ हजार ८५७ शेतकऱ्यांचे ९९.३२ कोटी व एक लाखाच्या आतील २५ हजार १३३ शेतकऱ्यांचे १२०.५४ कोटी रूपयांचे कर्ज थकीत आहे.राष्ट्रीयीकृत बँकांकडे ५० हजारांच्या आतील ८३ हजार ३६३ शेतकऱ्यांचे ६४०.९४ कोटी, व एक लाखाच्या आतील ४५ हजार १८७ शेतकऱ्यांचे ३३१.५२ कोटी रूपयांचे कर्ज थकीत आहेत.ग्रामीण बँकांकडे ५० हजारांच्या आतील ५७५ शेतकऱ्यांचे ०.६ कोटी व एक लाखांच्या वरील ५७ शेतकऱ्यांचे ०.२५ कोटी रूपयांचे कर्ज थकीत आहे.