शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीपूजनाकरिता घुबडाची तस्करी

By admin | Updated: November 7, 2015 00:14 IST

लक्ष्मीचे वाहन म्हणून प्रसिध्द असलेल्या घुबडाला सर्वसामान्य माणूस अशुभ समजतात. दिवाळी हा सण मात्र घुबडासाठी मृत्यूची घंटा ठरतो आहे.

वनविभाग झोपेत : धामणगाव तालुक्यात वनाधिकाऱ्यांचे मिळतेय सहकार्यमोहन राऊ अमरावतीलक्ष्मीचे वाहन म्हणून प्रसिध्द असलेल्या घुबडाला सर्वसामान्य माणूस अशुभ समजतात. दिवाळी हा सण मात्र घुबडासाठी मृत्यूची घंटा ठरतो आहे. अंधश्रध्देपोटी धनप्राप्तीकरिता या घुबडाचा मांत्रिकाच्या साहाय्याने बळी दिला जातो. घुबडांच्या तस्करीसाठी धामणगाव तालुक्यातील वनविभागाचे सहकार्य या तस्करांना मिळत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़ घुबड हा निशाचर प्राणी असला तरी रात्री व्यवस्थितरीत्या पाहू शकतो़ शिकारी पक्ष्यांमध्ये घुबडाचे कान तीक्ष्ण असतात़ दिवसा इतर पक्ष्यांची स्पर्धा टाळत हा घुबड रात्री शिकार करतो. पक्ष निरीक्षकांचा हा आवडता प्राणी असला तरी सर्वसामान्य माणूस त्याला अशुभ मानतो. परंतु अशुभ मानणारे काही मांत्रिक गुप्तधनासाठी घुबडाचा बळी घेतात़ व्यापारीही झाले सक्रिय घुबडाला लक्ष्मीचे वाहन म्हणून समजले जाते़ जेथे घुबड तेथे लक्ष्मी नांदते, असा अर्थ मांत्रिक काढतात. लक्ष्मी प्राप्तीसाठी घुबडांचा बळी देण्याचे प्रमाण वाढले आहे़ मंदीवर मात करण्यासाठी काही व्यापारी एक लाखाच्या जवळपास घुबड खरेदी करण्याचा हा अघोरी मार्ग पत्करते़ सुवर्णकरड्या रंगाच्या घुबडाला मोठी मागणी आहे. त्यासाठी मांत्रिक संपूर्ण जंगल पिंजून काढतात. जेवढे मोठे घुबड तेवढा पैसा घरात अधिक येणार, असा गैरसमज घुबडाच्या जीवावर बेतणारा आहे़ दिवाळीच्या दिवशी घुबडाचा बळी देऊन रक्त घरात शिंपडण्याची अघोरी प्रथा मांत्रिक करीत असल्याची माहिती आहे.घुबडाची पूजा केल्याने धनप्राप्ती होते, अशी अंधश्रध्दा असल्याने दिवाळीच्या तोंडावर घुबडाची तस्करी होऊ शकते. या भागात रात्रीला घुबडांची तस्करी होत असेल तर त्यासंदर्भातील माहिती पोलीस ठाण्यात कळविली जाईल. - ए.एन. गावंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, चांदूररेल्वे.