शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आॅईल मिल उद्योजकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 22:11 IST

क्षुल्लक रकमेसाठी कामगाराने तीक्ष्ण शस्त्राने वार करून आॅइल मिल मालकाची हत्या केल्याची घटना रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास एमआयडीसीत घडली. ठाकूरदास दुल्लाराम करेसीया (७६,रा. वृदांवन कॉलनी) असे मृताचे नाव आहे.

ठळक मुद्देकामगारास अटक : एमआयडीसी परिसरातील घटना

आॅनलाईन लोकमतअमरावती : क्षुल्लक रकमेसाठी कामगाराने तीक्ष्ण शस्त्राने वार करून आॅइल मिल मालकाची हत्या केल्याची घटना रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास एमआयडीसीत घडली. ठाकूरदास दुल्लाराम करेसीया (७६,रा. वृदांवन कॉलनी) असे मृताचे नाव आहे. या हत्याप्रकरणात राजापेठ पोलिसांनी विश्वास रामूजी शेषकार (४८, रा. राजनापूर्णा, आसेगाव) याला अटक केली आहे.विश्वास शेषकार हा दोन वर्षांपासून ठाकूरदास करेसीया यांच्या राजेंद्र आॅइल मिलमध्ये हेल्पर होता. अनेकदा तो कामावर गैरहजर राहत होता. गेल्या दोन महिन्यांपासून तर तो अनेकदा कामावर आलाच नव्हता. रविवारी दुपारच्या सुमारास विश्वास शेषकार राजेंद्र आॅइल मिलमध्ये गेला. नातेवाइकाच्या लग्नाचे कारण सांगून ठाकूरदास करेसीया यांना अडीच हजारांची मागणी केली. मात्र, त्यांनी पैसे दिले नाही. यावेळी विश्वास तेथून निघून गेला. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास तो पुन्हा आला आणि कार्यालयात बसलेले ठाकुरदास करेसीयांकडे पुन्हा पैशांची मागणी करीत वाद घातला. याच सुमारास लघुशंका करण्यासाठी बाथरूमकडे जात असलेले ठाकूरदास करेसीया यांच्या डोक्यावर विश्वासने तीक्ष्ण हत्याराने वार केले आणि तेथून पलायन केले. ठाकूरदास हे तेथेच निपचित पडले होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी आले नसल्याचे पाहून मुलगा नरेंद्र करेसीया यांनी चौकीदार राजकुमार ढोले यांच्याशी संपर्क केला. ढोले यांना ठाकूरदास हे कार्यालयातील बाथरुमजवळ मृतावस्थेत आढळून आले. खासगी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पाय घसरून पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा नातेवाइकांचा अंदाज होता. मात्र, डोक्यावरील गंभीर जखमांमुळे या घटनेची माहिती राजापेठ पोलिसांना देण्यात आली. याप्रकरणात पोलिसांनी विश्वास शेषकारविरुद्ध भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. त्याने हत्येची कबुली दिली आहे.सीसीटीव्हीमुळे बिंग फुटलेराजेंद्र आॅइल मिलच्या कार्यालयाबाहेरील सीसीटीव्हीत आरोपी विश्वास शेषकार कैद झाला आहे. तो कार्यालयाच्या आत गेला आणि काही वेळानंतर बाहेर आल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले. बाथरुमकडील बाजूला सीसीटीव्ही नसल्यामुळे विश्वास शेषकारने हत्या कशी केली, ही बाब स्पष्ट झाली नव्हती.आरोपीला अटकराजापेठ ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी, दुय्यम ठाणेदार तिवारी यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक अनिल मुळे, शिपाई अशोक वाटाणे, अतुल संभे, राहुल डेंगेकर, अमोल खंडेझोड व शेख दानिश यांनी चौकशी सुरू केली. एका पथकाने एमआयसीडीत शोध घेतला, तर एक पथक राजनापूर्णा येथे गेले. तो सोमवारी सकाळी गावात दाखल होताच पोलिसांनी पकडून राजापेठ ठाण्यात आणले.