शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

धामणगावात तेल, खनिजाचा शोध; ओएनजीसीचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 20:32 IST

कच्च्या तेलाची वाढती मागणी पुरी करण्यासाठी केंद्र शासनाने देशांतर्गत काही भागात भूगर्भामधील खनिजांचा शोध घेणे सुरू केले असून, त्यामध्ये धामणगाव रेल्वे तालुक्याचा समावेश आहे.

ठळक मुद्देसॅटेलाइटद्वारे सर्वेक्षण

मोहन राऊत/अमरावती : कच्च्या तेलाची वाढती मागणी पुरी करण्यासाठी केंद्र शासनाने देशांतर्गत काही भागात भूगर्भामधील खनिजांचा शोध घेणे सुरू केले असून, त्यामध्ये धामणगाव रेल्वे तालुक्याचा समावेश आहे. तालुक्यातील आठ गावांचे सर्वेक्षण सॅटेलाइटद्वारे केल्यानंतर प्राथमिक स्वरूपात बोअरद्वारे खोदकामास सुरुवात झाली आहे.देशाला पुरविल्या जाणाऱ्या खनिज तेलात ६९ टक्के आणि नैसर्गिक वायूत ६२ टक्के वाटा आॅइल अँड नॅशनल गॅस कॉपोरेशनचा आहे. ओएनजीसी ही संस्था खनिज तेलाचा शोध घेत असते. अमरावती जिल्ह्यातील काही भागात ही शोधमोहीम मागील महिन्यांपासून सुरुवात करण्यात आली. हैदराबाद येथील अल्फा जिओ (इंडिया) बंजारा या कंपनीशी ओएनजीसीने करारनामा केल्यानंतर जिल्ह्यातील विविध विभागांकडून परवानगी घेऊन शोधमोहिमेला सुरुवात झाली आहे.दोनशे फूट बोअरधामणगाव रेल्वे तालुक्यातील जळगाव आर्वी, काशीखेड, विरुळ रोंघे, वडगाव राजदी, रामगाव, दिपोरी, वाढोणा, तिवरा या भागात अल्फा जिओच्या माध्यमातून दोनशे फूट बोअर खोलीकरण करण्यात येत आहे. येथे तेल व नैसर्गिक वायू मिळते का, याची चाचपणी करण्यात येत आहे. या ठिकाणी खोदकामात मिळालेले नमुने दिल्ली येथील प्रयोगशाळेला पाठविण्यात येणार आहेत.शेतकरी संभ्रमावस्थेतमहसूल विभाग व शेतकºयांना अंधारात ठेवून थेट शेतातच बोअर मारण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. यामुळे आपल्या शेतात नेमके काय सुरू आहे, याविषयी शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. महसूल विभागाने यासंदर्भात माहिती देणे गरजेचे असल्याचे मत काही शेतकºयांनी व्यक्त केले.खनिज तेलाच्या शोधासाठी वनविभागाने अल्फा जिओ कंपनीला परवानगी दिली आहे. वनविभागाच्या कक्षेत असलेल्या जागेवर बोअर करण्याची संमती दिली आहे.- आशिष कोकाटे, वनपरिक्षेत्र अधिकारी, चांदूर रेल्वे

टॅग्स :Oil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्प