शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
3
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
4
Ishant Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
5
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
6
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
7
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
8
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
9
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
10
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
11
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
12
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
13
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
14
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
15
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
16
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
17
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
18
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
19
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
20
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकाऱ्यांना दिसेना मतदारसंघाबाहेरचा दुष्काळ

By admin | Updated: April 30, 2016 00:22 IST

जिल्ह्यात दुष्काळाबाबत सरकारकडून होणाऱ्या उपाय योजनांबाबत सतत नकारघंटा वाजवली जाते.

जिल्हा परिषद : दुष्काळी भागातील मर्यादित भागांकडेच लक्षजितेंद्र दखने अमरावतीजिल्ह्यात दुष्काळाबाबत सरकारकडून होणाऱ्या उपाय योजनांबाबत सतत नकारघंटा वाजवली जाते. मात्र अधिकारातील निर्णय घेऊन दुष्काळी भागातील लोकांना मदत करण्यासाठी लोकप्रतिनिधी-पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत आहे. मिनी मंत्रालयातील अध्यक्ष, उपाध्यक्ष व चार सभापती दुष्काळी भागाचे प्रतिनिधीत्व करतात. मात्र त्यांच्याकडून जिल्ह्यातील समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. पुढील वेळी बदलत्या आरक्षणात आपणाला संधी मिळणार नाही अशीच खुणगाठ बांधूनच गावच्या मर्यादित विकासाकडे लक्ष दिल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेत नेहमीचे कामकाजही संथगतीने सुरू आहेत. जिल्ह्यात दुष्काळी उपाययोजनाबाबत राज्यातील सरकारचे विरोधक म्हणून असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी किमान सत्ताधाऱ्यांविरोधात काम करत आहेत हे दाखविण्यासाठी आटापीटा सुरू आहे. किमान वातावरण निर्मिती केली जात आहे. अनेक वर्षे सत्तेत असलेल्यांकडून किमान विरोधातील भाषा लोकांच्या कानावर पडू लागली आहे. जिल्ह्यातील शेतकरी व जनता दुष्काळाचे चटके सहन करीत असताना राज्य शासनाविरोधात एकत्रित आंदोलन किंवा मोर्चाने सरकारचे लक्ष वेधून घेण्यात आल्याचे समाधान असले तरी ज्या गतीने यात उपाययोजना होणे अपेक्षित आहे. मात्र त्या होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरुणा गोरले, सरिता मकेश्वर ही सर्व पदाधिकारी मंडळी दुष्काळी तालुक्याचे नेतृत्व करतात त्यांच्याकडून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या माध्यमातून सरकारच्या अनेक योजना एकत्रित राबवून दुष्काळी भागातील लोकांना दिलासा देण्याचे काम यापूर्वीच सुरू करणे अपेक्षित होते. अधिकाऱ्यांना कामाला लावून योजना तयार केलेले दिसून येत नाही.