शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

वकिलाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा; बार असोसिएशन आक्रमक

By प्रदीप भाकरे | Updated: March 18, 2024 19:33 IST

पोलीस आयुक्तालयावर धडक; गुन्ह्यातून नाव कमी करण्याची मागणी.

अमरावती : मृत व्यक्तीच्या नावावर तोतया उभा करून मासोद येथील जमीन व्यवहाराप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात ॲड. वासुसेन देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याविरोधात अमरावती जिल्हा वकील संघ चांगलाच आक्रमक झाला आहे. याविरोधात वकील संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी १८ मार्च रोजी पोलीस आयुक्तालयावर धडक दिली. आयुक्तालयाच्या पायऱ्यांवर धरणे दिली. या गुन्ह्यातून ॲड. वासुसेन देशमुख यांचे नाव कमी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी वकील संघाच्या वतीने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.

निवेदनानुसार, ॲड. वासुसेन देशमुख यांच्याकडे एका पक्षकाराने मोहम्मद इकबाल भुरे खान यांच्यासोबत झालेल्या व्यवहाराची टोकन चिठ्ठी दाखवून आपल्याला या शेताचा व्यवहार करावयाचा आहे, असे सांगितले. त्यावर ॲड. देशमुख यांनी पक्षकारास जाहीर नोटीस प्रकाशित करण्यास सूचविले. जाहीर नोटीस प्रकाशित झाल्यावर त्यांच्याकडे आलेल्या हरकतीवरून मोहम्मद इकबाल भुरे खान हे मय्यत झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर १५ मार्च रोजी अज्ञात व्यक्तींनी मृतक मोहम्मद इकबाल भुरे खान यांच्या नावाने खोट्या दस्तऐवजाच्या आधारावर शेताची खरेदी सहनिबंधक यांच्याकडे लावली. ही बाब मोहम्मद इकबाल भुरे खान यांचे जावई तौसिफ काजी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी खरेदीचा व्यवहार थांबविला. या प्रकरणात संबंधित आरोपींसोबतच ॲड. वासुसेन देशमुख यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. यातील दहा आरोपींना अटक देखील करण्यात आली.

...तर आंदोलन अधिक आक्रमक करूवास्तविक पाहता या प्रकरणात ॲड. वासुसेन देशमुख यांची भूमिका फक्त पक्षकाराचे वकील म्हणून जाहीर नोटीस देण्यापर्यंतच होती. मात्र, त्यानंतरही पोलिसांनी शहानिशा न करता ॲड. देशमुख यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल. त्यामुळे या गुन्ह्यातून त्यांचे नाव कमी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी वकील संघाचे अध्यक्ष शिरीष जाखड, सचिव उमेश इंगळे, उपाध्यक्ष नीता तिखिले, ग्रंथालय सचिव अभिषेक निस्ताने, कार्यकारी सदस्य रसिका उके, सुदर्शन पिंपळगावकर, पीयूष डाहाके, पंकज यादगीरे, कुशल करवा, किरण यावले, भूमिका वानखडे, चंद्रशेखर डोरले यांच्यासह अन्य उपस्थित होते. 

टॅग्स :Amravatiअमरावती