शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

ट्युबोप्लॅस्टिनंतर बारा महिलांना अपत्यप्राप्ती

By admin | Updated: July 20, 2016 23:59 IST

गर्भाशयालगत असलेल्या नलिकेवर ट्युबोप्लॅस्टी ही शस्त्रक्रिया करुन १२ महिलांनी वर्षभरात गोंडस बाळाना जन्म दिला आहे.

रुग्णांना दिलासा : सुपर स्पेशालिटीच्या डॉक्टरांची यशस्वी कामगीरी संदीप मानकर अमरावतीगर्भाशयालगत असलेल्या नलिकेवर ट्युबोप्लॅस्टी ही शस्त्रक्रिया करुन १२ महिलांनी वर्षभरात गोंडस बाळाना जन्म दिला आहे. येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील डॉक्टरांनी ही यशस्वी कामगिरी बजावली आहे. स्त्रियांना अपत्यप्राप्तीसाठी गर्भाशय तसेच त्यालगत असलेल्या नलीका सुस्थितीत असणे गरजेचे असते. या नलिकेमध्ये काही दोष असल्यास महिलांना गर्भधारणा होत नाही. अशावेळी डॉक्टर टयुबोप्लॅस्टी ही शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला महिलांना देतात. या शत्रक्रियेनंतर महिलांना गर्भधारणा होऊ शकते. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वर्षभरात १२ महिलांमध्ये हा दोष आढळून आला होता. त्यानुसार डॉक्टरांनी या महिलांची तपासणी केली व त्यांना टयुबोप्लॅस्टी शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली. त्यानंतर पाचही जिल्हयातून दाखल झालेल्या बारा महिलांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या महिलांपैकी दोन महिलांचे कुटूंब नियोजनातून नसबंदीची शस्त्रक्रिया झाली होती. या दोन्ही महिलांना प्रत्येकी दोन-दोन मुले होती. परंतु काही वर्षापूर्वी ती मुले दगावली. त्यामुळे त्या महिलांना पुन्हा अपत्य हवे होते. या महिलाना सुध्दा शस्त्रक्रियानंतर अपत्य प्राप्ती झाली आहे. सुपर स्पेशालिटीचे वैद्यकीय अधीक्षक श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ट्यूबोप्लॅस्टी शस्त्रक्रिया तज्ज्ञ भरत शहा यांनी या महिलांवर नलिकेवर ट्युबो प्लॅस्टी ही शस्त्रक्रिया करुन त्या नलिका सुस्थितीत करण्यात आल्यात. यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने त्या महिलांची गर्भधारणेची अडचण दूर करण्यात आली. त्यामुळे शस्त्रक्रियानंतर महिलांचा अपत्यप्राप्तीचा मार्ग मोकळा झाला आणि त्यांनी गोंडस बाळांना जन्म दिला. ही शस्त्रक्रिया नि:शुल्क करण्यात आली असून यामुळे या सर्व मातांना मुले जन्माला घालता आले.नसबंदीनंतरही दोन महिलांना मुलेदोन महिलांनी कुटूंब नियोजनासाठी नसबंदीची शस्त्रक्रिया केली होती. मात्र, दोन्ही महिलांचे मुले काही कारणास्तव दगावले. त्यामुळे त्यांच्या घरात वंशाचा दिवा नव्हता. आता आपल्याला मुलेही होणार नाही. या चिंतेने त्या महिला अस्वस्थ होत्या. मात्र, त्यांना ट्युबो प्लॅस्टी या शस्त्रक्रियेची माहिती सुपर स्पेशालिटीतील तज्ज्ञ डॉक्टरानी दिली. त्या दोन्ही महिलांनी ट्युबो प्लॅस्टीची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना अपत्य प्राप्ती झाली. त्यामुळे आपल्याला पुन्हा गोंडस बाळ झाल्याचा आनंद त्यांचा गगणात मावेनासा होता. ट्युबोप्लॅस्टी शस्त्रक्रिया ही नि:शुल्क करण्यात येते. या शस्त्रक्रियेमुळे त्या १२ महिलांचा अपत्य प्राप्तीचा मार्ग मोकळा झाला होता. त्या सर्व महिलांना गोंडस बाळांना जन्म दिला असून त्या सुखरुप आहेत. ही सुपर स्पेशालिटीच्या डॉक्टरांची यशस्वी कामगिरी आहे. - श्यामसुंदर निकम, वैद्यकीय अधीक्षक, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल