शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर येथे वाघांची संख्या ‘ओव्हर फ्लो‘; विदर्भात वाघांचा कॉरिडॉर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:10 IST

व्याघ्र प्रकल्पाबाहेरील वाघांची सुरक्षितता धोक्यात, वनविभागामार्फत ट्रॅप कॅमेऱ्यांनी मॉनिटरिग अमरावती : व्याघ्र प्रकल्पाबाहेरील राखीव जंगलात स्थलांतरित वाघांनी क्षेत्र व्यापले ...

व्याघ्र प्रकल्पाबाहेरील वाघांची सुरक्षितता धोक्यात, वनविभागामार्फत ट्रॅप कॅमेऱ्यांनी मॉनिटरिग

अमरावती : व्याघ्र प्रकल्पाबाहेरील राखीव जंगलात स्थलांतरित वाघांनी क्षेत्र व्यापले आहे. चंद्रपूर येथे वाघांची संख्या ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने ते वाघ आता यवतमाळपर्यंत पोहोचत आहेत. एकूणच विदर्भात वाघांनी स्वत:च कॉरिडॉर तयार केल्याचे चित्र आहे. मात्र, व्याघ्र प्रकल्पाबाहेर पडणाऱ्या वाघांची सुरक्षितता धोक्यात आली, हेही तितकेच खरे आहे. जवळपास २४४ वाघ विदर्भात असल्याची नोंद घेण्यात आली आहे.

चंद्रपूर, भंडारा, गाेंदिया, गडचिरोली, ब्रम्हपुरी या पूर्व विदर्भात वाघांची संख्या अधिक झाली आहे. वाघांना आता बफर झोन, कोअर एरिया कमी पडू लागल्याने त्यांनी सावज शाेधण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाबाहेर धाव घेतली आहे. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया भागातील वाघांनी यवतमाळपर्यंत येण्याची मजल गाठली आहे. बुलडाणा येथील ज्ञानगंगा, वाशिम, पांढरकवडा आणि अकोला येथील राखीव जंगलात वाघांचे वास्तव्य आहे. मेळघाटातून वरूड, मोर्शी, सालबर्डीमार्गे मध्य प्रदेशातील जंगलात वाघांचा संचार वाढला आहे. राखीव वनक्षेत्रात वाघ असल्याची नाेंददेखील झाली आहे. बोर अभयारण्यातून गत दोन वर्षांपूर्वी चांदूर रेल्वे, पोहरा-मालखेड जंगलात वाघ आल्याची नाेंद आहे.

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असून, एकट्या विदर्भात ताडोबा-अंधारी, नवेगाव- नागझिरा, मेळघाट, पेंच, बोर अशी पाच अभयारण्ये आहेत. चंद्रपूर येथून यवतमाळ एमआयडीसीपर्यंत वाघांचा संचार वाढला आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर,काटोल, रामटेक, वानडोंगरी, कोंढाळी असा कॉरिडॉर तयार झाला आहे. विदर्भातील व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघ स्थलांतरित होत असून, सीमेलगतच्या मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यात मुक्त संचार करीत आहेत.

------------

गडचिरोलीच्या जंगलात मानव-वन्यजीव संघर्ष नाही

गडचिरोलीच्या जंगलातही वाघ आहेत. मात्र, जंगलात नक्षलवाद्यच्कडून टिपले जाऊ, या भीतीने येथे वाघांची शिकार करण्यात कुणी धजावत नाही. गडचिरोलीच्या जंगलात अंदाजे नऊ वाघ आहे. परंतु, येथे मानव-वन्यजीव संघर्ष नाही.

-------------

व्याघ्र प्रकल्पाबाहेरील राखीव वनांच्या परिसराची ‘टायगर बेअरिंग’ अशी नोंद असते. या भागात वाघ आढळल्यास त्याच्यावर ट्रॅप कॅमेरे, वनकर्मचाऱ्यांची पाळत ठेवली जाते. विदर्भात वाघांची संख्या वाढ झाली, हे खरे आहे. मात्र, स्थलांतरही वाढले आहे.

- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक

------------------

अशी आहे विदर्भात वाघांची संख्या

गोंदिया- १०

भंडारा - ८

वर्धा (बोर) - ८

अमरावती (मेळघाट) - ४४

अकोला (काटेपूर्णा) - ५

बुलडाणा (ज्ञानगंगा) - ७

यवतमाळ, आर्णी - ५

पांढरकवडा - १०

गडचिरोली - ९

वाशिम - २

चंद्रपूर (ताडोबा-अंधारी) - ८५

नागपूर - १२

टिपेश्वर - २५