शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

चाचण्यांची संख्या एक लाखाच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 05:00 IST

जिल्ह्यात ४ एप्रिल रोजी पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाली. त्याचे एक आठवड्यापासून परदेशातून किंवा मुंबई, पुणे आदी हॉटस्पॉट ठरलेल्या जिल्ह्यांतून परतलेल्या व क्वारंटाईन असलेल्या नागरिकांचे थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविण्यात येत होते. त्यावेळी नागपूर येथील ह्यएम्सह्णच्या विषाणू परीक्षण प्रयोगशाळेत नमुने तपासणीला पाठिवण्यात येत असे व त्यांचा अहवाल तिसऱ्या दिवशी मिळत होता. त्यानंतर सेवाग्राम व अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या लॅबमध्येही नमुने तपासणीला पाठविण्यात येत होते.

ठळक मुद्देनमुन्यांमध्ये १७ टक्के पॉझिटिव्हिटी : ८२ हजार नमुने निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे सात महिन्यांत ९८,७०७ नमुने तपासणी करण्यात आली. त्यात १६,३०२ अहवाल पॉझिटिव्ह आले. हे प्रमाण १७ टक्के असल्याने कोरोनाचा संसर्ग कमी झाला नसल्याचे स्पष्ट होते. अशीच स्थिती राहिल्यास दिवाळीनंतर कोरोनाचा पुन्हा उद्रेक होण्याची शंका वर्तविण्यात येत आहे.जिल्ह्यात ४ एप्रिल रोजी पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाली. त्याचे एक आठवड्यापासून परदेशातून किंवा मुंबई, पुणे आदी हॉटस्पॉट ठरलेल्या जिल्ह्यांतून परतलेल्या व क्वारंटाईन असलेल्या नागरिकांचे थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविण्यात येत होते. त्यावेळी नागपूर येथील ह्यएम्सह्णच्या विषाणू परीक्षण प्रयोगशाळेत नमुने तपासणीला पाठिवण्यात येत असे व त्यांचा अहवाल तिसऱ्या दिवशी मिळत होता. त्यानंतर सेवाग्राम व अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या लॅबमध्येही नमुने तपासणीला पाठविण्यात येत होते. जुलै महिन्यापासून अमरावती विद्यापीठाची प्रयोगशाळा सुरू झाल्याने येथेच रोज ५०० नमुन्यांची तपासणी होऊ लागली. ऑगस्ट महिन्यात रॅपिड ॲन्टिजन कीटद्वारेही नमुन्यांची तपासणी करयात येत आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील ९८,७०७ नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यात ८१,९६४ नमुने निगेटिव्ह आले. शुक्रवारपर्यंत १६,३०२ नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.लक्षणेविरहीत किंवा सौम्य लक्षणांची रुग्णसंख्या अधिक असल्याने आतापर्यंत १५,२७८ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. जिल्ह्यात डिस्चार्जचे प्रमाण उच्चांकी ९४ टक्के असल्याने दिलासा मिळाला आहे.४८ रुग्ण आयसोलेशन वॉर्डांतजिल्ह्यात सद्यस्थितीत ६७३ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी ३७२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत, तर ४८ रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. पॉझिटिव्हच्या संपर्कात असलेल्या ११४८ व्यक्तींना सध्या होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. एकूण दाखल ३०१ रुग्णापैकी ४५ रुग्णांची प्रकृती सामान्य व ५ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले, तर उपचारानंतर बरे वाटल्याने ११८ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला.विद्यापीठ लॅब अहवालात ९,२०९ पॉझिटिव्हसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विषाणू परीक्षण प्रयोगशाळेत आतापर्यंत ४८,२६२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. याध्ये ९,२०९ अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. ३८,६७३ निगेटिव्ह, तर २५३ प्रतीक्षेत आहेत. याशिवाय पीडीएमसी लॅबमध्ये ४,०११ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात १,३३३ पॉझिटिव्ह, तर खासगी लॅबमध्ये ४,००७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात १०२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय रॅपिड ॲन्टिजनचे ४१,५६० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात ४८३२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या