शहरं
Join us  
Trending Stories
1
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
2
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
3
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
4
'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...
5
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
6
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
7
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
8
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
9
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
10
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
11
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
12
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
13
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
14
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
15
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
16
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
17
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
18
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
19
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
20
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन

कोरोनाग्रस्तांची संख्या ४० हजारांच्या पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 05:01 IST

जिल्ह्यात चाचण्यांची संख्या कमी झाल्याने दोन दिवसांत संक्रमितही घटले. मंगळवारी १,२७४ नमुन्यांच्या चाचणीतून २८२ अहवाल पॉझिटिव्ह आले. मात्र, पाॅझिटिव्हिटी कमी झालेली नाही. २२.१३ टक्के अशी पॉझिटिव्हिटी मंगळवारी नोंदविली गेली. विद्यापीठ लॅबची क्षमतावाढ करण्यात आल्याने आता १६०० चाचण्यांची तपासणी होईल, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले असले तरी रविवारी सुटीचा दिवस असल्याने काही चाचणी नमुने केंद्रे बंद होती. 

ठळक मुद्देपुन्हा तीन मृत्यू अन् २८२ पाॅझिटिव्हची नोंद, विभागीय आयुक्तांच्या निर्देशाने तपासणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  जिल्ह्यात सोमवारी २८७ अहवाल पॉझिटिव्ह आले व तीन रुग्णांचा मृत्यूही झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाग्रस्तांची संख्या ४० हजार २६८ झाली आहे. महापालिका क्षेत्रात २६ हजारांवर रुग्णांची नोंद ही चिंताजनक बाब आहे.  जिल्ह्यात चाचण्यांची संख्या कमी झाल्याने दोन दिवसांत संक्रमितही घटले. मंगळवारी १,२७४ नमुन्यांच्या चाचणीतून २८२ अहवाल पॉझिटिव्ह आले. मात्र, पाॅझिटिव्हिटी कमी झालेली नाही. २२.१३ टक्के अशी पॉझिटिव्हिटी मंगळवारी नोंदविली गेली. विद्यापीठ लॅबची क्षमतावाढ करण्यात आल्याने आता १६०० चाचण्यांची तपासणी होईल, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले असले तरी रविवारी सुटीचा दिवस असल्याने काही चाचणी नमुने केंद्रे बंद होती. दरम्यान, लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर बाजारात पुन्हा गर्दी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर २० पथकांद्वारे दंडात्मक कारवायांची मोहीम जिल्हा प्रशासन राबवित आहे. त्यातही पथकप्रमुख दांडी मारून सहायकांना पाठवत असल्याचे दिसून आले.

बाहेर पडलेल्या रुग्णांना ७५ हजारांचा दंडमहापालिका आयुक्तांचे निर्देशानुसार होम आयसोलेशनमधील रुग्णांची तपासणी डॉ. सचिन बोंद्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली असता, तीन रुग्ण घरी आढळले नाहीत. या रुग्णांना प्रत्येकी २५ हजारांचा दंड करण्यात आला. हमालपुरा भागात ही कारवाई करण्यात आली. यापुढे एफआयआर नोंदविण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत

मंगळवारी तीन मृत्यू, ८५३ डिस्चार्ज जिल्ह्यात २४ तासांत अमरावती शहरात राठीनगरातील ७३ वर्षीय महिला, करुणनगरातील ७३ वर्षीय पुरुष व अचलपूर तालुक्यातील ५८ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ५७२ वर पोहोचली आहे. मंगळवारी ८५३ रुग्ण संक्रमणमुक्त झाले. ही संख्या आता ३३,८२१ झाली आहे. सध्या रुग्णसंख्या वाढल्याने रिकव्हरी रेट घटून ८३.९९ टक्क्यांवर आला आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या