शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अर्जांचा आकडा साडेतीन हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 22:56 IST

आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी पालकांनी सर्वत्र गर्दी झाली. आतापर्यंत ३ हजार ९०० अर्ज करण्यात आले.

ठळक मुद्देअमलबजावणी : आरटीई प्रवेश प्रक्रिया

आॅनलाईन लोकमतअमरावती: आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी पालकांनी सर्वत्र गर्दी झाली. आतापर्यंत ३ हजार ९०० अर्ज करण्यात आले. पालकांकडून मोठ्या प्रमाणावर अर्ज येत असल्याने यंदादेखील आरटीई प्रवेशासाठी मोठी चढाओढ राहण्याची चिन्हे आहेत.आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील बालकांसाठी असलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्हाभरातून आरटीई वेबसाईटवरून ही आॅनलाईन अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या केंद्रामधून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. अर्ज भरण्यासाठी आरटीईच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आर्थिकदुष्टया दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी विविध शाळांमध्ये २५ टक्के जागा राखून ठेवण्यात येतात. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांना या जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. सुरूवातीच्या टप्प्यात शाळांची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर आता १० ते २८ फेब्रुवारीपर्यंत आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. हे अर्ज सादर झाल्यानंतर लॉटरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नर्सरी, केजी १, आणि पहिल्या वर्गात प्रवेश दिले. जातील. आरटीई अंतर्गत विविध शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून इच्छुक पालकांनी आॅनलाईन अर्ज सादर करण्याची मोठ्या प्रमाणात लगबग सुरू केल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.अचूक माहिती भरागतवर्षी आरटीई २५ टक्क्याच्या कोट्यातून प्रवेशासाठी पालकांनी आॅनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी. काही तांत्रिक अडचण आल्यास शिक्षण विभागाशी संपर्क करावा. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार सदर आॅनलाईन प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.२३३ शाळांची नोंदणीआरटीई अंतर्गत शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना २५ टक्के जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यात २३३ शाळांची नोंदणी करण्यात आली आहे. ३ हजार ९०० जागांवर आरटीईमधून प्रवेश दिले जाणार आहेत.