शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील महिला वनरक्षकाला एनटीसीएचा ‘वाघ रक्षक’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:13 IST

चिखलदरा (अमरावती) : मेळघाट वनविभागात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामाची दखल घेत थेट एनटीसीएकडून एका वनरक्षकाला ‘वाघ रक्षक’ पुरस्कार ...

चिखलदरा (अमरावती) : मेळघाट वनविभागात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामाची दखल घेत थेट एनटीसीएकडून एका वनरक्षकाला ‘वाघ रक्षक’ पुरस्कार जाहीर झाला. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गौरवात त्यांनी मानाचा तुरा खोवला आहे.

मोनिका चौधरी (३१) यांनी हा पुरस्कार पटकावला आहे. योगशास्त्र या विषयामध्ये त्यांनी एमए केले. २०११ ला वनविभागामध्ये त्या रुजू झाल्या. अत्यंत दुर्गम असलेल्या धूळघाट क्षेत्रात कार्य केल्यानंतर सध्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील मेळघाट वन्यजीव विभागातील दुर्गम जामली वनपरिक्षेत्रातील गिरगुटी या डोंगर नियतक्षेत्रात त्या कार्यरत आहेत. या क्षेत्रात काम करताना त्यांनी गिरगुटी गावामध्ये असलेल्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती व गावकरी यांना सोबत घेऊन वनसंरक्षण व संवर्धनासंबंधी उत्तम कार्य केले. यामध्ये १०० टक्के एलपीजी सिलिंडर वाटप करून जंगलातील वृक्षतोड लोकसहभागातून पूर्णपणे बंद केली. या वन्यजीव क्षेत्रात असलेले ३५ हेक्टर अतिक्रमणसुद्धा स्थानिक लोकांना सोबत घेऊन काढले, हे विशेष. या क्षेत्रात वन्यजिवांची रेलचेल आता दिसून येत आहे. याशिवाय या गावांमध्ये वन्यजिवांसाठी कुरण विकासाचेही उत्तम कार्य करून वनांतील प्राण्यांना संजीवनी दिली. याचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष फायदा मानव प्राणी संघर्ष कमी होण्यासाठी झाला आहे. मोह वृक्षाची नर्सरी करून दहा हजार रोपे लोकांना त्यांच्या शेतामध्ये लावण्याकरिता दिले, ज्यामधून भविष्यात त्यांना उत्पादन प्राप्त होईल. वाघांचा व वन्यजिवांचा अधिवास समजून घेण्यासाठी जंगलामध्ये प्रेशर इम्प्रेशन पॅड तयार केले. नियमित वनगस्तीदरम्यान २०२०-२१ मध्ये साधारणत: २६६४ किमी गस्त केली व वन्यजिवांची अभ्यास पूर्ण माहिती संकलित केली.

मानचिन्ह व एक लाख रुपये रोख असे बक्षिसाचे स्वरूप आहे. वनरक्षक मोनिका चौधरी यांच्या यशाचे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक जयोती बॅनर्जी, मेळघाट वन्यजीव विभागाच्या विभागीय वनअधिकारी पीयूषा जगताप यांनी कौतुक केले.

---------------

कोट

आपण काम करीतच गेलो. वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनात चांगले सहकार्य मिळाले आणि एवढा मोठा पुरस्कार मिळेल, असे कधीच वाटले नव्हते. हा एक सुखद धक्का मिळाला. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघांसाठी काम करताना आनंद होत आहे.

- मोनिका चौधरी, वनरक्षक, खोंगडा (मेळघाट वन्यजीव विभाग, परतवाडा)