शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
4
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
5
‘’महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
6
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
7
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
8
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
9
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
10
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
11
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
12
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
13
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
14
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
15
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
17
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
18
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
19
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
20
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य

महिला बचत गटांना आता ‘आॅन दि स्पॉट’ कर्ज

By admin | Updated: March 8, 2017 00:07 IST

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत महिला बचत गटांसाठी सुमतीताई सुकळीकर व्याज अनुदान योजनेंतर्गत जमापुंजीच्या आठपट कर्ज त्वरित मंजूर करण्याचा प्रस्ताव आहे.

महिलांना दिलासा : डीआरडीएचा आयसीआयसीआय बँकेशी करारअमरावती : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत महिला बचत गटांसाठी सुमतीताई सुकळीकर व्याज अनुदान योजनेंतर्गत जमापुंजीच्या आठपट कर्ज त्वरित मंजूर करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे बचत गटांतील महिलांना कर्जासाठी बँकेचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. परिणामी बचत गटांना दिलासा मिळण्याची शक्यता यामुळे व्यक्त होत आहे.जिल्ह्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत एकूण ८ हजार ४४१ बचत गट आहेत. सन २०१७ साठी या विभागाला ६२७ नवीन बचत गट सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. बचत गटांना कर्ज उपलब्ध करून घेणाऱ्यासाठी चकरा माराव्या लागत होत्या. यासोबतच विविध कागदपत्रांची जुळवा-जुळव करण्यासाठी महिलांचा बराच वेळ वाया जात होता. अनेक भेटीतून शाखा व्यवस्थापकाची भेट झाली, तर महिलांना पुढची तारीख देऊन वेळ मारून नेत होते. त्यामुळे महिला त्रस्त होत होत्या. मात्र या निर्णयामुळे चित्र बदलणार आहे. डीआरडीएने यासाठी वरिष्ठ स्तरावररून नोव्हेंबर २०१६ मध्ये आयसीआय बँकेशी बचत गटातील महिलांना या योजनेंतर्गत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी करार केला आहे. त्यासंदर्भात जिल्हास्तरावर शाखा व्यवस्थापकांची बैठक घेण्यात आल्याची माहिती आहे. बॅक शाखा व्यवस्थापक वा त्यांनी नियुक्त केलेला व्यक्ती मंजूर झालेल्या बचत गटांची प्रत्यक्ष भेट घेणार आहे.बचत गटाची कागदपत्र, नियमित व्यवहार,तसेच बँकेतील ठेव पाहून त्वरित बँकेतील ठेवीच्या आठपट कर्ज मंजूर केले जाणार आहे. यावेळी बचत गटांतील महिलांच्या आधार कार्डासह इतर कागदपत्राची तपासणी केली जाणार आहे. जे बचतगट बँकेकडून घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करतील, अशा बचत गटांना या योजनेंतर्गत इतर बँकेतून शून्य टक्के तर आयसीआय बँकेतून २ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होईल. याचा बंद असलेल्या बचत गटांना कर्ज देण्यासाठी बॅकांत स्पर्धा लागणार आहे. (प्रतिनिधी)डीआरडीएतर्फे तालुकानिहाय कर्जवाटपाचे नियोजनसुमतीताई सुकळीकर व्याज अनुदान योजनेंतर्गत तालुकानिहाय कर्जवाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.यामध्ये अमरावती १९८, भातकुली १९८, नांदगाव खंडेश्र्वर १९८, चांदूररेल्वे १९८, धामनगाव रेल्वे १९७, तिवसा १९८, मोर्शी १९८, वरूड १९८, अचलपूर १९८,चांदूरबाजार १९८,दर्यापूर १९६, अंजनगाव सुर्जी १९८, चिखलदरा १९८, धारणी १९८ यानुसार २ हजार ७६६ बचत गटांना कर्ज वाटपाचे नियोजन आहे.महिला बचत गटांना कर्जपुरवठा करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेसोबतच आयसीआय बँकेशीही करार झाला आहे. सुमतीताई सुकळीकर व्याज अनुदान योजनेंतर्गत जमापुंजीच्या आठपट कर्ज थेट जागेवरच मंजूर होणार आहे. मात्र एडीएसवाय योजनेचे थकीबाकीदार असलेल्या बचत गटांना मात्र याचा लाभ थकीत कर्ज निल केल्याशिवाय मिळणार नाही.- क्रांती काटोले, प्रकल्प संचालक, डीआरडीए