शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

मिनिमंत्रालयातील फायलींची आता प्रतीक्षा संपली

By admin | Updated: September 22, 2015 00:32 IST

जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत प्रभारी अधिकाऱ्यांवर प्रशासनाची धुरा सोपविल्याने कामकाजात ...

सुनील पाटील रूजू : प्रभारी सीईओ लांडगे यांनी पदभार सोडलाअमरावती : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत प्रभारी अधिकाऱ्यांवर प्रशासनाची धुरा सोपविल्याने कामकाजात जोखीमीचे कामे करताना येणाऱ्या अडचणीचा फटका महत्वाच्या फायलींना बसला होता.मात्र आता मुळ नियुक्तीवर असलेली मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी सोमवारी आपल्या पदाची सूत्रे स्विकारल्याने मिनिमंत्रालयातील प्रलंबीत फायलीचा मार्ग मोकळा आल्याने पदाधिकारी सदस्य यांच्या अडचणी दुर होणार आहे.जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील हे मागील ६ आॅगस्ट पासून म्हसुरी येथे ४५ दिवसांच्या प्रशिक्षणावर गेले होते. त्यांचा ६ सप्टेंबर रोजी प्रशिक्षणाचा कालावधी संपला आहे. त्यानंतर ते २० सप्टेंबरपर्यंत रजेवर असल्याने त्याचा कार्यभार विभागीय आयुक्त कार्यायातील आस्थापना विभागाचे उपायुक्त सुनील लांडगे यांच्याकडे अतिरिक्त सोपविण्यात आला होता. त्यामुळे त्यांना मुख्य जबाबदारीसह जिल्हा परिषदेचे कामकाज सांभाळावे लागत आहे. अशातच वरिष्ठ पातळीवरून दररोज घेण्यात येणाऱ्या बैठका आणि विविध विषयांवर होणाऱ्या व्हीडीओ कॉन्सफस आणि अन्य कामांचा ताण वाढत आहे. याच कामकाजात व दौऱ्यात अधिक वेळ जातो. जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या कामकाजा संबंधित महत्त्वाच्या फायली लांबणीवर पडत आहेत. विशेष म्हणजे लांडगे यांच्याकडे केवळ काही दिवसापर्यतच अतिरिक्त पदभार सोपविला असल्याने जिल्हा परिषदेतील पदाधिकारील सदस्य व विभागा प्रमुख यांच्या कडून मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे येणाऱ्या महत्वाच्या फायली पैकी काही फायली जोखमीच्या असल्याने याला हात न लावलेलाच बरा अशी अवस्था प्रभारी अधिकाऱ्यांची झाली होती. त्यानीच अशा फायलीचा निपटारा केला बरा अशा मानसिकतेत अधिकारी होते. त्यामुळे आता जोखीमीची कामे व महत्वाच्या प्रशासकीय कामकाजाच्या फायली सुनिल पाटील रूजू झाल्यामुळे मोकळया करण्याची प्रक्रीया २१ सप्टेबर पासून जिल्हा परिषदेत सुरू झाल्याने पदाधिकारी, विभाग प्रमुख यांच्या प्रलंबीत फायलीचा निपटारा विहीत वेळेत होणार आहे.जिल्हा परिषदेतील प्रशासकीय कामकाज विहीत वेळेत मार्गी लावण्यासाठी प्रशासनाचा प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडताना नेहमीच प्राधान्य आहे. त्याच दृष्टिकोनातून कामाच्या फायली योग्य पडताळणी करून निकाली काढल्या जातील.- सुनील पाटील,मुख्यकार्यकारी अधिकारी, जि.प.