शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

आता वाढणार पुनर्वसूच्या कोल्ह्याचा धुमाकूळ

By admin | Updated: July 5, 2016 00:51 IST

जिल्ह्यात सद्यस्थितीत सर्वदूर सार्वत्रिक पाऊस पडला आहे. मंगळवारपासून पुनर्वसू नक्षत्र सुरू होत आहे.

सार्वत्रिक पाऊस : सर्वच तालुक्यांत पेरणीला वेग अमरावती : जिल्ह्यात सद्यस्थितीत सर्वदूर सार्वत्रिक पाऊस पडला आहे. मंगळवारपासून पुनर्वसू नक्षत्र सुरू होत आहे. या नक्षत्रात पहिल्या पंधरवाड्यात चांगला पाऊस पडणार आहे. नंतर मात्र पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दक्षिण गुजरातपासून केरळच्या उत्तर किनारपट्टीपर्यंत द्रोणीय स्थितीचा प्रभाव कायम राहिल्याने विदर्भात पावसाने यंदा प्रथमच सरासरी गाठली. पुढील २४ तासांत म्हणजेच ५ जुलैपर्यंत जिल्ह्यासह विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचा नागपूर हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यानंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होत जाणार आहे. मात्र, मध्यम स्वरूपाचा पाऊस महिन्याच्या अखेरपर्यंत राहणार आहे. ५ ते १५ जुलै दरम्यान मध्यम स्वरूपाचा व १५ ते २५ जुलैदरम्यान पाऊस कमी राहल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान जिल्ह्यात १ ते ४ जुलैपर्यंत पावसाची १८१.७ मिमी सरासरी अपेक्षित असताना २३०.७ मिमी पाऊस पडला. ही टक्केवारी १२७ टक्के आहे. ४ जुलै रोजी अमरावती शहरासह ग्रामीण भागात ११ मि.मी. पाऊस पडला. सर्वाधिक ४३.१ मिमी पाऊस मोर्शी येथे पडला. नांदगाव २२.७, तिवसा १८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.११७० शेतकऱ्यांच्या तीन हजार हेक्टर पिकांचे नुकसानजिल्ह्यात शनिवारी व रविवारी आलेल्या जोरदार पावसामुळे अचलपूर तालुक्यामधील नदी-नाल्यांना पूर आला. यामध्ये मौजा येसुर्णा, खानापूर, चिंचखेड, टोंगलाबाद, खानापूर, सावळापूर, सावळी येथील २३५ शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले. दर्यापूर तालुक्यात वाघाडी, चांदई, खोलनागवे, आटाळ, माटरगाव, गौरखेडा, बेंबळा, दारापूर या गावांमधील ८२० शेतकऱ्यांच्या ४०० हेक्टर पिकांचे नुकसान झाले. चिखलदरा तालुक्यात सत्तीरूई फाटा नदीला पूर आल्यामुळे ३० शेतकऱ्यांचे नुकसान झाले, असे जिल्ह्यात एकूण १,१७० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.दोन व्यक्ती पुरात वाहून गेलीरविवारी पेढी नदीला आलेल्या पुरामुळे भातकुली येथील निखिल मनोहर पंचबुद्धे (२२) हा युवक वाहून गेला. त्याचा मृतदेह सोमवारी सकाळी मूर्तिजापूर तालुक्यातील सोनोरी येथे आढळून आला. तसेच मोर्शी येथे नळा नदीला आलेल्या पुरामुळे चिनाबाई देवराव कुमरे ही ६० वर्षीय महिला वाहून गेली.