शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आता कैद्यांनाही मांडता येणार मनातील व्यथा !

By admin | Updated: September 2, 2016 00:11 IST

उत्तुंग चार भिंतींच्या आत सूर्योदय ते सूर्यास्त अशी दिनचर्या असलेल्या कैद्यांना आता आपल्या व्यथा मांडता येणार आहेत.

पाच समस्यांवर मंथन : अमरावती कारागृहात बंदीसुधार अभियान प्रारंभअमरावती : उत्तुंग चार भिंतींच्या आत सूर्योदय ते सूर्यास्त अशी दिनचर्या असलेल्या कैद्यांना आता आपल्या व्यथा मांडता येणार आहेत. याच पार्श्वभूमिवर अमरावती मध्यवर्ती कारागृहात बंदीसुधार अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे. सोमवारी कैद्यांनी मांडलेल्या व्यथांनी कारागृहाच्या भिंती देखील द्रवल्या.अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक भाईदास ढोले यांनी बंदीसुधारणा व पुनर्वसनांतर्गत विविध सामाजिक संघटना, महिला व बालकल्याण विभागाच्या सहकार्याने कैद्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे पाषाण भिंतींच्या आत हातून कळत, नकळत झालेल्या चुकांचे प्रायश्चित शिक्षेच्या रुपात भोगत असलेल्या कैद्यांना त्यांच्या व्यथा, वेदना मांडण्याची संधी बंदीसुधार अभियानातून मिळाली आहे. खरे तर कारागृहातील दिनचर्या ठरलेलीच. परंतु सामाजिक जाण असलेले अधिकारी असले की, वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या समस्या, प्रश्न क्षणात मार्गी लावता येतात. याची प्रचिती कारागृह अधीक्षक ढोले यांनी बंदीसुधार अभियानामुळे आली. सोमवारी पार पडलेल्या कार्यशाळेत कैद्यांना जेल प्रशासनाने पाच विषयांवर बोलते केले. यात बंदीसमस्या, कारागृह स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती अभियान, मानसिक रुग्ण असलेल्या कैद्यांचे सर्वोच्च व उच्च न्यायालयात अपील तसेच वैद्यकीय उपचार या विषयांचा समावेश होता. अभियानात सुमारे ६०० कैद्यांनी सहभाग घेतला. पहिल्यांदाच कैद्यांना त्यांच्या मनात दडलेल्या भावना मांडण्याची संधी मिळाल्याने अनेक कैदी गहिवरून गेले होते. एरवी जेलर दंडुक्याचा धाक दाखवित कारागृहात नियमांचे धडे देत असतात. कैद्यांना त्याची सवय झाली असते. या चाकोरीबद्ध जीवनात अचानक कैद्यांना त्यांच्या समस्या, प्रश्न मांडण्याची संधी दिल्याने कैद्यांना आश्चर्य तर वाटलेच पण सुखद धक्काही बसला. कारागृहातील खुल्या पटांगणात एकत्र येऊन ‘मनातील व्यथा नि:संकोचपणे मांडा’, असे कारागृह अधीक्षक ढोले यांनी सांगताच अनेकांना गहिवरून आले. हळूहळू कैद्यांच्या मनातील भीती दूर झाली. बहुतांश कैद्यांनी नातेवाईकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मनोरुग्ण कैद्यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याबाबतची व्यथा मांडली. कारागृहात मनोरुग्ण कैद्यांना वेगळ्या बराकीत ठेवले जाते. मात्र, कारागृह अधीक्षकांनी मनोरुग्ण कैद्यांच्याही समस्या ऐकून घेतल्यात. मनोरूग्ण कैदी देखील माणसेच आहेत. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी कारागृह प्रशासन सदैव तत्पर राहिल, असे अभिवचन त्यांनी कैद्यांना दिले. कैद्यांचे प्रश्न, समस्या खुल्या मनाने कारागृह प्रशासन ऐकत असल्याने अनेक बंदीजनांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद झळकला. दरम्यान चार कैद्यांनी व्यसनमुक्तीचा निर्धार केला. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर समाजात परत जाताना गुन्हेगार आणि व्यसनाचा कलंक पुसून टाकण्याची शपथ चार बंद्यांनी घेतली. या अभिनव कार्यक्रमाला कारागृह अधीक्षक भाईदास ढोले, महिला व बालकल्याण अधिकारी चवरे, वऱ्हाड संस्थेचे नागदिवे, प्रमोद मेश्राम, अवेअरनेस संस्थेचे अमित शहाळकर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक जाधव, मंडळ तुरूंगाधिकारी सदांशिव, मोडकर, सुभेदार तिवस्कर, पांडे, सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी भूषण कांबळे, अंमलदार दाबेराव, वैद्यकीय अधिकारी गणोरकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.