शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

-आता तालुका स्तरावर मिळणार पासपोर्ट

By admin | Updated: January 16, 2017 00:11 IST

पासपोर्ट देण्यात परराष्ट्र मंत्रालयाने सुलभता आणली आहे.

नागरिकांना दिलासा : परराष्ट्र मंत्रालयाचे सकारात्मक पाऊलअमरावती: पासपोर्ट देण्यात परराष्ट्र मंत्रालयाने सुलभता आणली आहे. विभागीय स्तरावर पासपोर्ट मिळविण्याच्या किचकट प्रक्रियेला आता विराम देत प्रमुख तालुका, पोस्ट कार्यालयात पासपोर्ट देण्याचा विचाराधीन केंद्र शासन आहे. तसेच पासपोर्ट मोबाईल व्हॅन हा उपक्रम सुरू केला जाणार आहे.राज्यात काही जिल्ह्यांमध्ये ठराविक ठिकाणी पासपोर्ट मिळविण्यासाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारले जातात. मात्र, पासपोर्टसाठी मागणी वाढत असल्याच्या पार्श्वभूमिवर आता तालुका स्तरावर पासपोर्ट कार्यालये स्थापन करण्याचा विचार सरू आहे. सामान्य नागरिकांनाही सहजतेने पासपोर्ट मिळावा, यासाठी केंद्र सरकारने योग्य पावले उचलली आहेत. नागरिकांनी पासपोर्ट मिळण्यासाठी आॅनलाईन अर्ज सादर केल्यानंतर आवश्यक त्या कागदपत्रे घेऊन आता पासपोर्ट मिळेल. पासपोर्ट म्हणजे सामान्य कागद नाही. त्यामुळे पासपोर्ट देताना प्रशासनाने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनच संबंधितांना पासपोर्ट द्यावा, असे निर्देश परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहेत. पासपोर्ट प्रक्रियेतील अडथळे दूर करून किचकट प्रक्रियेला पूर्णविराम मिळणार आहे. पासपोर्ट मिळण्यासाठी सादर करावयाच्या अर्जात शिथिलता आणली गेली आहे. जन्मतारखेच्या पुराव्याची, आई- वडिलांची नावे नमूद करण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. आई- वडिलांची नावे माहीत नसलेल्या अनाथ आश्रमातील मुलांना पासपोेर्ट मिळण्यासाठी यामुळे दारे खुली झाली आहेत. याशिवाय सन्यासी, घटस्फोटित, दत्तक व्यक्तिंनाही पासपोर्ट मिळविण्यासाठी आता अर्ज करता येणार आहे. देशात दर दिवशी ५० नागरिकांचे पासपोर्ट जारी केले जात असल्याची माहिती आहे.असे मिळेल पासपोर्टपासपोर्ट मिळण्यासाठी सुलभता आणण्याचा प्रयत्न परराष्ट्र मंत्रालयाने हाती घेतला आहे. आता विभागीय स्तरावर पासपोर्टकरिता अर्ज स्वीकारले जातात. मात्र येत्या काळात प्रमुख पोस्ट कार्यालयातही पासपोर्टसाठी अर्ज करता येणार आहे. नागरिकांनी पासपोर्ट मिळण्यासाठी आॅनलाईन अर्ज केल्यानंतर त्याला मुलाखतीची तारीख दिली जाईल. त्यानंतर संबंधित तारखेला मुलाखतीमध्ये आवश्यक कागदपत्रे सादर करावे लागतील.