अमरावती : वीजदेयके भरण्यासाठी मुदत संपल्यानंतरही यापुढे दंडाच्या रकमेसह देयक आॅनलाइन भरण्याची सोय महावितरणने वीज ग्राहकांना संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहे. चालू महिन्यापासून या सुविधेला सुरुवात करण्यात आली आहे. महावितरणने देयकाचा भरणा करण्याची सुविधा ६६६. ेंँं्िर२ूङ्मे.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहे. सर्व लघुदाब वीज ग्राहकांना क्रेडीट किंवा डेबीट कार्ड तसेच नेटबँकींगद्वारे वीज देयक भरता येणार आहे. यापूर्वी वीजदेयक भरण्याची मुदत संपुष्टात आल्यानंतर संबंधीत देयक आॅनलाईन भरणे शक्य नव्हते. वीज देयकांचा भरणा करतांना ग्राहकांना दंडाच्या रक्कमेसह वीजेदेयकाचा भरणा करावा लागणार आहे. सद्य:स्थितीत अमरावती परिमंडळात हजारो वीजग्राहक दरमहा कोट्यावधी रुपयांच्या देयकांचा आॅनलाईन भरणा करीत आहेत. आता मुदतीनंतरही वीजदेयके भरण्याची सोय उपलब्ध झाल्याने आॅनलाइन देयके भरण्याच्या ग्राहक संख्येत व रक्कमेत निश्चित वाढ होणार आहे. आॅनलाइन किंवा देयकाचा भरणा ग्राहकांनी मुदतीनंतर भरणा केल्यास संबंधित वीजग्राहकाचे नाव थकबाकिदारांच्या यादीत टाकण्यात येते. त्यामुळे मुदतीनंतर आॅनलाइन वीजदेयककांचा भरणा करणाऱ्या ग्राहकांनी देयकाची पावती महावितरणच्या संबंधित कार्यालयास दाखवावी आणि वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
आता वीजदेयके भरण्यासाठी मुदतीनंतर ‘आॅनलाईन’ सुविधा
By admin | Updated: October 5, 2014 22:57 IST