शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

हायवेवर आता ‘मोबाईल’ दारुविक्री

By admin | Updated: May 8, 2017 00:06 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हायवेवर दारुबंदी झाली, हे खरे आहे.

पोलीस अनभिज्ञ : ब्रॅण्ड सांगा ; १० मिनिटांत दारू उपलब्ध, दारूबंदीनंतरचा नवा फंडा लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हायवेवर दारुबंदी झाली, हे खरे आहे. मात्र, आता राज्य महामार्गावर मोबाईल दारुविक्रीचा नवा फंडा विक्रेत्यांनी शोधून काढला आहे. दारूचा केवळ ब्रॅण्ड सांगितला की अवघ्या १० मिनिटात पाहिजे ती दारू उपलब्ध करुन दिली जाते. मोटरसायकलद्वारे मोबाईल दारुविक्री सुरु झाली आहे.मद्यप्राशन करुन वाहने चालविली जात असल्याने हायवेवर अपघातांची संख्या वाढली होती. नेमकी हीच बाब सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे मांडली गेली. परिणामी हायवेपासून ५०० मीटर अंतरावर सर्व प्रकारच्या दारु विक्रीला लगाम लावण्यात आला आहे. मात्र, याच हायवेवर आता दारुबंदीनंतर फिरती दारुविक्री सुरु झाली आहे. नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला एखादे वाहन थांबल्यास काही क्षणात एखादी दुचाकी येऊन धडकते. दुचाकीवरून आलेल्या तरुणांकडून ‘सर वाईन हवी काय’ अशी विचारणा केली जाते. वाहनातील व्यक्तींनी होकार देताच लगेच कोणता ब्रॅण्ड हवा, असे विचारले जाते. बॅ्रण्ड आणि किंमत ठरताच १० मिनिटांत दुचाकीवरील दोन युवकांपैकी एक दारु आणायला जातो. जादा दराने सर्रास दारूविक्री अमरावती: अवघ्या काही मिनिटांत ग्राहकाच्या सूचनेनुसार दारु आणून दिली जाते. तिवसा ते कोंढाळी दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर मोबाईल दारुविक्रीचा व्यवसाय सुरु झाला आहे. हायवेवर बियर बार, वाईन शॉपला टाळे लागल्याने याच दुकानांमधील नोकरांनी मोबाईल दारूविक्रीच्या माध्यमातून रोजगार मिळविण्याची नवी शक्कल लढविल्याची माहिती आहे. हायवेवरून जाणाऱ्या वाहनांमध्ये महिला आढळल्यास तेथे दारू हवी का, अशी विचारणा केली जात नाही, हे विशेष. त्यामुळे हायवेवर दारुबंदी झाली असली तरी मद्यपींना अगदी सहजरित्या मनासारखा ‘ब्रॅण्ड’ मिळत असल्याचे वास्तव आहे. भरारी पथकाची जबाबदारी वाढलीहायवेवर मोबाईल दारुविक्री सुरु झाल्यामुळे पोलीस आणि एक्साईज विभागाची जबाबदारी वाढली आहे. हायवेवरील दारूविक्री रोखण्याच्या उद्देशाने दारू दुकाने बंद करण्यात आली होती. आता त्याच हायवेवर ‘मोबाईल दारुविक्री’ची नवी समस्या निर्माण झाली आहे. एक्साईजच्या भरारी पथकाला आता मोबाईल दारुविक्री थांबविण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. यामुळे पोलीस प्रशासनाचे काम वाढले आहे.हायवेवर जिल्ह्याच्या हद्दीत मोबाईल दारुविक्री रोखण्यासाठी फिरत्या पथकाकडे विशेष जबाबदारी सोपविली जाईल. मोबाईल दारुविक्रेत्यांवर कायदेशिर कारवाई केली जाईल.- प्रमोद सोनोनेअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अमरावती.