शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आता छोटे व्यावसायिकही मालगाडीने पाठविणार माल

By admin | Updated: April 18, 2016 00:06 IST

छोट्या व्यावसायिकांना थेट मालगाडीने माल पाठविता यावा, यासाठी मध्य रेल्वे भुसावळ विभागाने ही सोय उपलब्ध करून दिली आहे.

३१ मे पर्यंत बुकिंग : उत्पन्नवाढीसाठी रेल्वेचा पुढाकारअमरावती : छोट्या व्यावसायिकांना थेट मालगाडीने माल पाठविता यावा, यासाठी मध्य रेल्वे भुसावळ विभागाने ही सोय उपलब्ध करून दिली आहे. त्याकरिता देशाच्या कानाकोपऱ्यात माल पाठविण्यासाठी ३१ मेपर्यंत बुकींग करणे अनिवार्य असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. उत्पन्न वाढीसाठी हा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.रेल्वेत मालगाडीने माल पाठविण्याकरिता मोठे व्यापारी धजावतात. मात्र मालगाडीने माल पाठवायचे झाल्यास लहान, सहान व्यावसायिक पुढाकार घेत नाही. परंतु आता छोट्या व्यावसायिकांना व्यापार वृद्धिंगत करण्याची संधी रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. मालगाडीच्या एका वॅगनमध्ये ६४ टन माल पाठविता येतो. त्यानुसार ३१ मेपर्यंत माल, बूक करण्यात आल्यास तो व्यावसायिकांना ठरावीक ठिकाणी पाठविता येईल. त्याकरिता संपूर्ण मालगाडी बूक करण्याची गरज भासणार नाही, असे रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे. रेल्वे सेवेशी लहान, सहान व्यावसायिक जोडलो जावेत, हा यामागील मुख्य उद्देश असून भुसावळ विभागातून माल पाठविण्यासाठी ३१ मेपर्यंत माल पाठविण्यासाठी बुकिंग झाल्यास संबंधित व्यापाऱ्यांचा माल निश्चित ठिकाणी रेल्वे पोहोचवेल. या उपक्रमाचा मुख्य उद्देश केवळ रेल्वे प्रशासनाचे उत्पन्नात वाढ करणे होय. छोट्या व्यावसायिकांना रेल्वेने मालवाहतूक करणे फारच त्रासदायक राहते. कारण संपूर्ण मालगाडी रॅक बुकिंग करणे छोट्या व्यापाऱ्यांना परवडणारे ठरत नाही. मात्र रेल्वेने छोट्या व्यापाऱ्यांचा माल निश्चित ठिकाणी पाठविण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.रेल्वे प्रशासनाने उत्पन्न वाढीसाठी रिकाम्या जागांवर बीओटी तत्त्वावर व्यापारी संकुलाची निर्मिती करण्याचा संकल्प घेतला आहे. रेल्वेत अनेक उपक्रम राबवून तिजोरी भरली जात असताना मालवाहतुकीतही आमूलाग्र बदल करण्यात आला आहे. भुसावळ विभागातील रेल्वे स्थानकावर बुकिंगछोट्या व्यापाऱ्यांना मालगाडीने माल पाठविण्याची संधी रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमांतर्गत भुसावळ मध्य रेल्वे विभागातील मुख्य रेल्वे स्थानकावर माल पाठविण्यासंदर्भात बुकिंग केली जाईल. यात जंक्शन असलेल्या रेल्वे स्थानकावर ही सुविधा उपलब्ध असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच छोट्या व्यापाऱ्यांना त्यांचा माल पाठविण्याची सोय करून देण्यात आली आहे. ही बाब निश्चितच व्यापाऱ्यांसाठी लाभदायक ठरणारी आहे. लहान व्यापाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, यामागील मूळ उद्देश आहे. - व्ही. डी. कुंभारे,वाणिज्य निरीक्षक, अमरावती रेल्वे स्थानक