शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आता फक्त एक दिवस...

By admin | Updated: September 21, 2016 00:12 IST

कोपर्डी येथील अमानवीय घटनेचा निषेध करण्यासाठी सुमारे पाच लाख मराठे गुरुवारी येथील गर्ल्स हायस्कूल चौकात उभे ठाकणार आहेत.

पाच लक्ष मराठे उतरणार रस्त्यावर : प्रचंड उत्साह, समाजाची उत्सुकता शिगेलाअमरावती : कोपर्डी येथील अमानवीय घटनेचा निषेध करण्यासाठी सुमारे पाच लाख मराठे गुरुवारी येथील गर्ल्स हायस्कूल चौकात उभे ठाकणार आहेत. कोट्यवधी मराठ्यांच्या आत्मसन्मानाच्या या लढ्याला आता केवळ एक दिवस शिल्लक असल्याने एकीकडे नियोजन अंतिम टप्यात आले आहे. दुसरीकडे समाजातील सर्व घटकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गुरुवार २२ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता नेहरूमैदानातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करेल. राज्यात सर्वदूर होत असलेले मराठ्यांचे मोर्चे 'रेकॉडब्रेक' होत असल्याने या अस्मितेच्या आणि स्वाभिमानाच्या लढ्यात उतरण्याचा लाखो मराठ्यांनी चंग बांधला आहे. अमरावतीचा मोर्चा न भुतो न भविष्यती करण्यासाठी आक्रमक मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. या मोर्चात गाव खेड्यातून लोंढेच्या लोंढे धडकणार असल्याने महापालिका व पोलीस प्रशासनाने बैठकींचा सपाटा लावला आहे. कित्येक वर्षानंतर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मराठा एकत्र आला असून त्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक मराठा हरखून गेला आहे. अमरावती जिल्ह्याचा मराठा क्र ांती मोर्चा 'रेकॉर्डब्रेक' करण्यासाठी सकल मराठा बांधव एकत्र आले असून त्या एकतेची चुणूक गुरुवारी अनुभवायला मिळणार आहे. (प्रतिनिधी)या आहेत प्रमुख मागण्या कोपर्डी येथील घटनेतील गुन्हेगारांना मरेपर्यंत फाशी देण्यात यावी, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा निर्णय त्वरित घेण्यात यावा, मराठा समाजातील विद्यार्थ्यांकरिता जिल्हास्तरावर स्वतंत्र वसतिगृहे आणि स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्रे उभारण्यात यावीत, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग टाळण्याकरिता आवश्यक त्या सुधारणा करण्यात याव्यात, मराठा समाजातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला त्वरित शासकीय मदत आणि शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, शेतमालाला योग्य तो भाव देऊन बहुसंख्येने शेतकरी असलेल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी हा मराठा क्रांती मूकमोर्चा काढला जात आहे.गुरुवारी शहरबस बंद मराठा क्रांती मूकमोर्चाच्या अनुषंगाने गुरुवार २२ सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवसभर शहरबसेस बंद ठेवण्यात येणार आहेत. नेहरु मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मराठा क्रांती मूकमोर्चा काढण्यात येणार असल्याने शहरबस बंद राहतील. याची नागरिक, प्रवासी आणि विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे आवाहन महापालिकेचे उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी केले आहे.शाळा बंद ठेवा -अमरावती जिल्हा शिक्षण संस्था संघमराठा मोर्चाची व्यापकता लक्षात घेता २२ ला जिल्ह्यातील शिक्षण संस्था बंद ठेवण्याबाबत निर्णय घेऊन तसे आदेश निर्गमित करावेत, अशी विनंती जिल्हा शिक्षण संस्था संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मराठा मूकमोर्चाच्या अनुषंगाने जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी तसेच याप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्था बंद ठेवण्याबाबत निर्णय घेऊन तसे आदेश निर्गमित करण्याची विनंती संघाच्या अध्यक्षा कांचनमाला गावंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.शहरात कलम ३३ (१) (ब) २२ सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मूकमोर्चा काढला जात आहे. मोच्यार्साठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वाहनांसह नागरिक नेहरू मैदानात एकत्रित होतील. हा मोर्चा नेहरु मैदान-राजकमल चौक-जयस्तंभ चौक-मालविय चौक-इर्विन चौक-गर्ल्स हायस्कूल चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे. या मार्गात वाहतुकीची कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्या दृष्टीने पोलीस उपायुक्त शशीकुमार मिना यांनी शहरात २२ सप्टेंबरला सकाळी ८ ते मोर्चा संपेपर्यंत बहुतांश मार्गावरील वाहतुक बंद करुन इतर मार्गाने वळविण्याबाबत आदेश पारित केले आहे.