शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आता गोवंश हत्या करणाऱ्यांची खैर नाही

By admin | Updated: July 26, 2016 00:27 IST

चांदूरबाजार येथील घटनेच्या पार्श्वभूमिवर शहरातील बडनेरा व नागपुरी गेट हद्दीतील काही ठिकाणी कोम्बिंग आॅपरेशन चालविले जाईल.

विशेष पथक तयार : बडनेरा, नागपुरी गेट हद्दीत कोम्बिंग आॅपरेशनअमरावती : चांदूरबाजार येथील घटनेच्या पार्श्वभूमिवर शहरातील बडनेरा व नागपुरी गेट हद्दीतील काही ठिकाणी कोम्बिंग आॅपरेशन चालविले जाईल. यासाठी पोलीस उपनिरीक्षकांच्या नेतृत्वात तीन पथके गस्त घालणार आहेत. त्यामुुळे आता शहरात गोवंश हत्या करणाऱ्यांची खैर नाही, असे चित्र दिसून येत आहे. खरवाडीतील भीषण अपघात गोवंशाची अवैध वाहतुकीमुळे घडला आहे. त्या पार्श्वभूमिवर जिल्हा पोलीस विभाग सतर्क झाला आहे. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या आदेशाने गोवंश हत्या करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवले जाईल. याकरिता नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील लालखडी, गुलिस्ता नगर, जमील कॉलनी, गवळीपुरा, कमेला ग्राऊंड व बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चमन नगर, अलमास नगर, नवी वस्ती, बैल बाजार या नऊ ठिकाणी हे कोम्बिंग आॅपरेशन चालविले जाणार आहे. या कोम्बिंगसाठी एक पीएसआय व चार कर्मचारी असे शस्त्रधारी पथक तीन पाळीत कोम्बिंग गस्त घालणार आहे. या पथकावर पोलीस उपायुक्त व सहायक पोलीस आयुक्त नियंत्रण राहणार आहे. हे पथक वरील दिलेल्या परिसरात गस्त घालून गोवंश हत्या व वाहतुकीसंदर्भात लक्ष ठेवून तत्काळ कारवाई करणार आहे. त्यामुळे आता गोवंश हत्या करणाऱ्याची खैर नसल्याचे चिन्ह दिसून येत आहे. पथकांवर 'वॉच'गोवंश हत्या थांबविण्याच्या उद्देशाने पोलीस विभागाने कोम्बिंग आॅपरेशनसाठी तीन पाळीत पथके सज्ज केली आहेत. या पथकाचे कामकाजावर पोलीस उपायुक्त व सहायक पोलीस आयुक्त लक्ष ठेवणार आहे. या कोम्बींग आॅपरेशनदरम्यान पोलिसांनी कामचुकारपणावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांच्यावर कारवाई केली जाईल.एसीपी करणार दिवसाआड कारवाईगोवंश हत्या व वाहतुकीसंदर्भात एसीपींचे एक पथक दिवसाआड कोम्बिंग आॅपरेशन राबविणार आहे. यामध्ये आरसीपी जवानाची मदत घेतली जाईल. नागपुरी गेट हद्दीत एसीपी चेतना तिडके व फे्रजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एसीपी रियाजुद्दीन देशमुख यांच्या नेतृत्वात हे कोम्बिंग आॅपरेशन राबविले जाणार आहे.