आयुक्तांचा निर्णय : २१ जुलैपासून युद्धस्तरावर मोहीम सुरुअमरावती : सार्वजनिक आरोग्याला बाधा पोहोचविणाऱ्या उघड्यावर मांस विक्रीला लगाम लावण्यासाठी आता संबंधित मांस विक्रे त्यांवर फौजदारी दाखल करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. त्यानुसार २१ जुलैपासून ही कारवाई युद्धस्तरावर केली जाणार असून उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांची खैर नाही, असे संकेत आहेत.मुंबई महापालिका अधिनियमानुसार सार्वजनिक आरोग्याला बाधा पोहोचविल्यास दंडात्मक वजा फौजदारी कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यामुळे शहरातील काही भागांत राजरोसपणे उघड्यावर मांस विक्री करण्याचा व्यवसाय सुरु आहे. या मांस विक्रेत्यांवर महापालिका पशु वैद्यकीय विभाग व अतिक्रमण निर्मूलन पथकाच्यावतीने मध्यंतरी कारवाई सुरु राहते. मात्र उघड्यावरील मांस विक्रीच्या समस्येवर कायम तोडगा काढण्यासाठी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी विक्रेत्यांवर थेट फौजदारी कारवाई करुन नियमानुसार मांस विक्री करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. नगरसेविका सुजाता झाडे, अर्चना इंगोले यांचा भागात उघड्यावर मांस विक्री सर्रासपणे होत असल्याने त्यांनी ही बाब प्रशासनाकडे सातत्त्याने लावून धरली आहे. कारवाई करुन उघड्यावरील मांस विक्रीवर तोडगा निघाला नाही. परिणामी आयुक्तांनी आता उघड्यावरील मांस विक्री रोखण्यासाठी फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. आयुक्तांनी मंगळवारपासून ही कारवाई करण्याचे आदेश पशुवैद्यकीय अधिकारी सचिन बोंद्रे आणि अतिक्रमण निमूर्लन पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्याकडे सोपविली आहे. (प्रतिनिधी)या परिसरात होते उघड्यावर मांस विक्रीअप्पर वर्धा कॉलनी, शेगाव रोड, रहाटगाव, सार्तुणा, बेलपुरा, नवसारी, चपराशीपुरा, यशोदानगर, काँग्रेसनगर मार्ग, कंवरनगर चौक, विलासनगर, गोपानगर, साईनगर, पठाणचौक, हैदरपुरा, महेद्र कॉलनी, छायानगर, वलगाव मार्ग इतवारा बाजार, बडनेरा जुनिवस्ती व नविवस्ती आदी परिसरात उघड्यावर मांस विक्रीे होत असल्याची माहिती आहे.मांस विक्री करण्याला मनाई नाही. परंतु मांस विक्री नियमानुसार व्हावी. नागरिकांचे आरोग्यास बाधा पोहचत असलेल्या स्थळी मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई होईल.- चंद्रकांत गुडेवारआयुक्त, महापालिका
आता उघड्यावर मांस विक्री केल्यास फौजदारी
By admin | Updated: July 19, 2015 00:28 IST