शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
3
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
4
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
5
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
6
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
7
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
8
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
9
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
10
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
11
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
12
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
13
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
14
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
15
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
16
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
17
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
18
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
19
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
20
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास

आता हॉकर्स झोनची अंमलबजावणी झोनस्तरावर

By admin | Updated: July 16, 2014 23:51 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महापालिका हद्दीत हॉकर्स झोन निर्माण करुन त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

अमरावती: सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महापालिका हद्दीत हॉकर्स झोन निर्माण करुन त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. त्याकरिता उपसमिती गठित करण्यात आली असून २३ जुलै रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.महानगरात रस्त्याच्या कडेला किंवा गर्दीच्या ठिकाणी हातगाडी, ठेले व किरकोळ व्यवसाय करणाऱ्यांना वाहतुकीस अडथळा न होता स्वतंत्रपणे व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याबाबतची कार्यवाही करणे अपेक्षित आहे. यापूर्वी हॉकर्स झोन निर्माण करण्यासंदर्भात अनेकदा बैठका झाल्या आहेत. मात्र आचारसंहिता आणि प्रशासनाच्या दिरंगाईने हॉकर्स झोन वेळेत निर्माण झाले नसल्याचे चित्र आहे. हॉकर्स झोन निर्माण करुन ते नियमानुसार व्यवसायिकांना उपलब्ध करुन द्यावे,याकरिता गत आठवड्यात मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपायुक्त रमेश मवासी यांनी हॉकर्स झोन निर्माण करण्याबाबत आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्यवाहीच्या लेखाजोखा सादर केला. जागेची अडचण, वाहतुकीची समस्या, अपघात होणारी स्थळे, जनतेला होणारा त्रास आदी विषयांची बाजू प्रशासनाने मांडली. दरम्यान प्रशासनाने पोलीस विभागासोबत बैठक घेऊन काही स्थळे निश्चित केली आहेत. या स्थळांवर हॉकर्स झोन निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या पाचही झोनमध्ये उपसमिती गठीत करण्याचे ठरविण्यात आले आहे. झोन निश्चित झाल्यानंतर त्याला अंतिम मंजुरीचे अधिकार या उपसमितीला देण्यात आले आहे. हॉकर्स झोन निर्मितीचा विषय लांबणीवर पडल्याने प्रशासनाला आता हॉकर्सना न्याय देण्याची भूमिका पार पाडावी लागणार आहे. त्याकरिता २३ जुलै रोजी उपसमितीची बैठक होत आहे.