शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामासाठी आता राखेच्या विटांची सक्ती

By admin | Updated: August 4, 2016 00:10 IST

पर्यावरण संवर्धनासाठी कोळसा किंवा लिग्नाईटवर चालणाऱ्या औष्णिक वीज केंद्रापासून ३०० किलोमीटर परिघात इमारत बांधकाम तसेच पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी....

पर्यावरण संवर्धन : कंत्राटदारांना घ्यावे लागणार प्रमाणपत्र अमरावती : पर्यावरण संवर्धनासाठी कोळसा किंवा लिग्नाईटवर चालणाऱ्या औष्णिक वीज केंद्रापासून ३०० किलोमीटर परिघात इमारत बांधकाम तसेच पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी कंत्राटदारांना राखेपासून बनविलेल्या उत्पादनांचा वापर करणे शासनाने आता बंधनकारक केले आहे. केंद्रीय पर्यावरण व वनमंत्रालयाच्या ३ नोव्हेंबर १९९९ च्या अधिसूचनेनुसार भूपृष्ठावरील उपजाऊ मातीपासून लाल विटा तयार करणाऱ्या उत्पादनाला प्रतिबंध केला आहे. राखेद्वारा तयार करण्यात आलेल्या विटा तांत्रिकदृष्टया सरस असून पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे अशा विटांचा वापर नॉन स्ट्रकचरल कामांसाठी तसेच लोड बेअरिंग स्ट्रकचरसाठी करण्याचे आदेश शासनाने यापूर्वीच दिले आहेत. त्यात आता शनिवारच्या आदेशान्वये सुधारणा करण्यात आली आहे. औष्णिक विद्युतकेंद्राच्या ३० किमी परिघात राखेच्या विटांचा वापर सक्तीचा असताना १०० किमी अंतरासाठी राखेपासून बनविलेली उत्पादने, रस्ते, बांधणी प्रकल्प व शेती संबंधित मृद संधारणासाठी आवश्यक राखेच्या वाहतुकीसाठी होणार संपूर्ण खर्च आता औष्णिक विद्युत केंद्राकडून करण्यात येणार आहे. तसेच ३०० किमी पर्यंतच्या वाहतुकीचा खर्च, वापर करणारे मालक व औष्णिक विद्युत केंद्र यांनी करायचा आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत तयार होणारे रस्ते बांधणी प्रकल्प, मालमत्ता निर्मितीच्या शासकीय योजनांमधून बांधण्यात येणाऱ्या इमारती, रस्ते, धरणे यासाठी लागणाऱ्या राखेच्या औष्णिक विद्युत केंद्रापासून ते प्रकल्प क्षेत्रापर्यंत वाहतुकीचा पूर्ण खर्च औष्णिक विद्युत केंद्र करणार आहे. पायाभूत सुविधेसाठी वापराव्या लागणार राखेच्या विटा शासनाच्या विविध योजना, प्रकल्प तसेच इमारतीच्या बांधकामासाठी (बांधकामक्षेत्र एक हजार चौरस फूट जास्त असेल) औद्योगिक वसाहती, उद्योग व उपवने किंवा पायाभूत सुविधेच्या बांधकामासाठी फ्लायअ‍ॅशपासून तयार केलेल्या विटांचा वापर यापुढे करावा लागणार आहे. रक्कम अदा करण्यापूर्वी द्यावे लागणार प्रमाणपत्र ज्या शहराची लोकसंख्या १ कोटीपेक्षा अधिक आहे.त्या ठिकाणच्या इमारत बांंधकाम नियमावलीत सुधारणा केली आहे. रस्ते व पायाभूत सुविधांसाठी खर्चाची रक्कम संबंधित कंत्राटदारांना अदा करताना औष्णिक विद्युत केंद्राचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना कार्यक्षेत्र निश्चित करण्याच्या सूचना करण्यात आली आहे.