शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

आता रेतीचोरट्यांवर ‘एफआयआर’

By admin | Updated: September 27, 2016 00:11 IST

रेती तस्करांची वाढती दादागिरी आणि मध्यरात्री होणाऱ्या रेतीचोरीवर अंकूश ठेवण्यासाठी ....

तहसीलदारांचे आदेश : रेती तस्करांचे धाबे दणाणले धारणी : रेती तस्करांची वाढती दादागिरी आणि मध्यरात्री होणाऱ्या रेतीचोरीवर अंकूश ठेवण्यासाठी आता थेट पोलिसांत ‘एफआयआर’ दाखल करण्याच्या सूचना तहसीलदार अशोक देवकर यांनी दिल्याने रेतीतस्करांचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे ‘लोकमत’मध्ये याबाबत वेळोवेळी वृत्त प्रकाशित केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तालुक्यातील तापी, गडगा, सिपना यानद्यांसह अनेक नाल्यांमधून रेतीचे अवैध खनन अहोरात्र सुरू असते. मनाई असताना सुद्धा हा प्रकार सुरूच आहे. रेती तस्करांनी त्यांचे तगडे नेटवर्क जागोजागी तैनात केले असून अधिकारी व कर्मचारी कारवाईसाठी निघताच त्याची सूचना भ्रमणध्वनीवरून त्यांना मिळते. त्यामुळे या रेती तस्करांपर्यंत पोहोचणे कठीण झाल्याची माहिती तहसीलदार अशोक देवकर यांनी दिली. मात्र, यापुढे आता मध्यरात्री अवैध रेतीतस्करी करताना आढळल्यास थेट पोलिसांत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. तशा तोंडी सूचना संबंधित नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला आहे. रेती तस्कर ज्याप्रकारे नेटवर्क पसरवून स्वत:चे कातडे वाचविते त्याच धर्तीवर आता रेती तस्करांविरूद्ध कारवाई करण्याकरिता महसूल विभागानेसुद्धा सापळे रचण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे रेतीतस्करांचे धाबे दणाणले आहेत. या कृतीमुळे अवैध रेती खननावरही अंकूश लागण्याची चिन्हे आहेत. (तालुका प्रतिनिधी)नेत्यांचा अधिकाऱ्यांवर दबावमहसूल विभागाद्वारे महत्प्रयासाने सापळे रचून पकडलेले अवैध रेतीचे ट्रॅक्टर सोडून द्यावेत, यासाठी अनेक नेते तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. याची कारणमीमांसा केली असता बहुतांश रेतीचे ट्रॅक्टर्स हे राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या मालकीचे किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचे असल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलीस कारवाई न करता दंडात्मक कारवाईचा दबाव अधिकाऱ्यांवर टाकला जात असल्याची परिसरात चर्चा आहे.