शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘ई-रिक्षा’ने गल्लीबोळातील कचरा उचलणार

By admin | Updated: November 2, 2015 00:29 IST

गल्लीबोळातून घंटी कटल्याद्वारे कचरा उचलण्याच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत आता महानगरातील कचरा ‘ई-रिक्षा’ने उचलला जाणार आहे.

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल : नगरसेवक प्रदीप हिवसे यांचा पुढाकारअमरावती : गल्लीबोळातून घंटी कटल्याद्वारे कचरा उचलण्याच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत आता महानगरातील कचरा ‘ई-रिक्षा’ने उचलला जाणार आहे. शहराचा ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमात समावेश झाल्यानंतर कचरा उचलण्याची ‘स्मार्ट’ प्रणाली नगरसेवक प्रदीप हिवसे यांच्या पुढाकाराने समोर आली आहे. प्रदूषणमुक्त ‘ई-रिक्षा’ला आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनीदेखील संमती दर्शविली आहे.महानगरात कचरा उचलणे, वहन करणे, कम्पोस्ट डेपोवर पोहचविणे आदी बाबी आरोग्य विभागाच्या देखरेखीत सुरु आहे. गल्लीबोळातून घराघरातून निघणारा कचरा हा घंटी कटल्याद्वारे गोळा केला जातो. ही व्यवस्था ४३ प्रभागातही सुरू आहे. घंटी कटल्याचे व्यवस्थापन हे सफाई कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आले आहे. मात्र घंटी कटल्यातून वहन होणारा कचरा ठिकठिकाणी रस्त्यावर पडत असल्याचे चित्र आहे. घंटी कटल्याला साजेसे पण कमी वेळेत जास्त काम होण्याची हमी असलेला ‘ई-रिक्षा’ने कचरा उचलण्याची प्रणाली सुरु केल्यास ती सुकर होईल. ‘ई- रिक्शा’ हा बॅटरीवर चालणारा असून शासनाने मान्यता प्राप्त केल्याची बाब नगरसेवक प्रदीप हिवसे यांनी आयुक्तांचा लक्षात आणून दिली. अमरावती शहर हे ‘स्मार्ट’ होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना कचरा उचलण्याची प्रक्रिया देखील ‘स्मार्ट’ होणे काळाची गरज असल्याचे नगरसेवक प्रदीप हिवसे यांचे मत आहे. कचरा उचलण्यासाठी ‘ई-रिक्षा’चा वापर केला गेल्यास इंधन खर्चही लागणार नाही, हे वास्तव आहे. कमी खर्चात जास्त सेवा हे ‘ई-रिक्षा’चे वैशिष्ट्य आहे. बॅटरी चार्र्जींग करण्यासाठी १० ते १२ रुपये लागत असून ७९ ते ८० किलोमिटरपर्यत तो चालू शकते. घंटी कटल्यात कचरा गोळा केल्यानंतर तो तुंबून ओढताना सफाई कर्मचाऱ्यांची जी घालमेल होते, ती ‘ई-रिक्षा’ वापराने थांबेल, असे प्रशासनाचे म्हणने आहे. (प्रतिनिधी)