शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

आता भोगवटदार वर्ग २ रद्दबातल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 01:24 IST

ज्या जागांबाबत मर्यादित धारणाधिकारांसह प्र्रदान भूमिस्वामी हक्काच्या किंवा हस्तांतरणाचे अधिकार नियमन करून भूमिधारी अधिकारातील जमीनधारक हा वर्ग आता रद्दबातल करण्यात आला.

ठळक मुद्दे२१ एप्रिलनंतरचे आदेश बाद : विधी अधिकाऱ्यांचे विभागीय आयुक्तांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ज्या जागांबाबत मर्यादित धारणाधिकारांसह प्र्रदान भूमिस्वामी हक्काच्या किंवा हस्तांतरणाचे अधिकार नियमन करून भूमिधारी अधिकारातील जमीनधारक हा वर्ग आता रद्दबातल करण्यात आला. ही सुधारणा विभागातील सर्व महसूल अधिकाऱ्यांना माहिती होण्यासाठी आदेश निर्गमित करावेत, अशी विनंती विधी अधिकारी अ‍ॅड. धनंजय तोटे यांनी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांना बुधवारी केली.२१ एप्रिल २०१८ पासून हा कायदा अस्तित्वात आल्याने भोगवटदार वर्ग-२ च्या जमीनी भोगवटदार वर्ग-१ मध्ये परावर्तित झाल्या आहेत. अशा जमिनीचे रूपांतर करण्यासाठी जर महसूल अधिकाºयाकडे कोणतेही अर्ज, अपील, पुर्नविचार याचिका, पुनर्निरीक्षण प्रकरण कलम २४६ जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्वये सुरू असतील, असे प्रकरणे कलम २४६ (अ) समाविष्ट झाल्याने निरक्षित झाली आहे. अशा प्रकरणातील भोगवटदार वर्ग-२ मधील जमिनी आता भोगवटदार वर्ग-१ मध्ये कायदेशीर परावर्तित झाल्याने भूमी अभिलेख्यात दुरुस्ती आवश्यक आहे. यासंदर्भात सबंधित अर्धन्यायिक स्वरूपाचे किंवा प्रशासकीयदष्ृट्या हाताळण्यात येत असलेली प्रकरणे आता निरक्षित झालेली आहेत. ही बाब विधी अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांच्या निदर्शनात आणली.शासनाद्वारा कायद्याची स्थिती स्पष्टजमीन महसूल अधिनियमात २१ एप्रिल २०१८ रोजी सुधारणा करण्यात आल्यानंतर महसूल विभागाने ७ जून २०१८ रोजी कायद्यातील सुधारणांची स्थिती स्पष्ट करून भूमी अभिलेख्यांमध्ये दुरुस्तीची प्रक्रिया विशद केली आहे. याविषयी विभागातील सर्व महसूल अधिकाऱ्यांना अवगत करणे महत्त्वाचे असल्याची बाब विभागीय विधी अधिकारी अ‍ॅड. धनंजय तोटे यांनी विभागीय आयुक्तांच्या निदर्शनात आणली आहे....अन्यथा चुकीचे आदेश होतील पारितभविष्यात एखादे न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास अभिलेखीय नोंदी व अर्धन्यायिक आदेश यामुळे परपस्परविरोधी कागदपत्रे सादर होण्याची शक्यता आहे. अशा कागदपत्रांच्या आधारे चुकीचे आदेश पारित होऊ शकतात. त्यामुळे विभागीय आयुक्त अमरावती व नागपूरद्वारा २०१२ मध्ये राबविण्यात आलेल्या महाराजस्व अभियानातील व त्यानंतर दाखल प्रकरणांचा निपटारा एकत्रितपणे करणे महसुली अधिकाºयांना सुलभ होईल.