शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

आता बनावट बियाणे नियंत्रणासाठी मोहीम

By admin | Updated: May 11, 2015 23:56 IST

ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बनावट बियाणे बाजारात आणून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार नेहमीच समोर ....

सतर्कता : कृषी आयुक्तांचे कृषी विकास अधिकाऱ्यांना निर्देशअमरावती : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बनावट बियाणे बाजारात आणून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार नेहमीच समोर येतो. यंदा शासनाने बनावट बियाण्याची विक्री करणाऱ्याविरुद्ध मोहीम उघडलेली दिसते. जिल्हास्तर, तालुकास्तरावर बनावट बियाण्यांचा छडा लावण्यासाठी पथके तयार करण्याचे निर्देश कृषी आयुक्तांनी दिले आहेत. मागील वर्षी निसर्गाने शेतकऱ्यांना दगा दिला. परंतु बियाण्यांची उगवण वेळीच झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागला. कर्ज काढूनही शेतकरी संकटातून बाहेर पडू शकला नाही. यावेळी तसे होऊ नये, म्हणून शासन गंभीर दिसत आहे. बनावट बियाणे तयार करणारी यंत्रणा हंगामाच्या वेळी सक्रिय होते. शेतकऱ्यांना चांगले बियाणे उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी बियाणे कंपन्यांवर असताना चुकीचा मार्ग अनुसरला जातो. दरवेळी काही विक्रेते पकडले जातात. बियाणे जप्त कले जाते. तरीही बेमुर्वतपणा संपत नाही. शेतकरी सध्या अडचणीत सापडलेला आहे. त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. त्यासोबतच बियाणे उत्पादकांनीसुद्धा हातभार लावावा. शेतकऱ्यांची परीक्षा घेऊ नये, अशी अपेक्षा आहे. यावर नियंत्रण ठेवणारी पथके व्हावी, त्यामुळे बनावट बियाणे करणाऱ्यांना धडा शिकविले जाईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने तालुका समित्या कार्यरत असतानच केवळ हंगामात नाहीतर त्यांचे कार्य वर्षभर सुरू असते. फरक इतकाच की खरीप, रबी हंगामात शेतकऱ्यांची लुबाडणूक होऊ नये म्हणून अधिकची सतर्कता बाळगली जाते. यावेळीही आम्ही पूर्ण शक्तीनिशी यंत्रणा सज्ज केली आहे. बनावट बियाणे उत्पादकांवर फौजदारी दाखल कराबनावट बियाणे उत्पादकांवर फौजदारी दाखल करण्याचे निर्देश महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी कृषी विभागाला दिले आहेत. शेतकऱ्यांच्या माथी चुकीचे बियाणे लादणाऱ्यांची मुळीच गय करु नका, असे आदेश त्यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने कृषी आयुक्त कार्यालयाने सतर्कतेच्या सूचना दिल्या.बोगस बी-बियाणे विकण्याच्या प्रकारांना आळा घालणे ही कृषी विभागाची जबाबदारी आहे. असा प्रकार करण्यावर प्रत्येक तालुकास्तरावर विशेष पथक तैनात आहे. असे प्रकरण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. -उदय काथोडे, कृषी विकास अधिकारी