शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आता बांबू गार्डन यू-ट्यूबवर उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 22:36 IST

राज्याच्या वनविभागात नावलौकिक मिळविणारे येथील बांबू गार्डन यू-ट्यूब झळकत आहे. या गार्डनमध्ये असलेल्या बांबूच्या दुर्मिळ आणि मौल्यवान ६३ प्रजातींची माहिती सहजतेने उपलब्ध आहे. त्यामुळे आता एका क्लिकवर बांबू गार्डनबाबत इत्थंभूत माहिती मिळणे सुकर झाले आहे.

ठळक मुद्देएका क्लिकवर मिळणार माहिती : बांबूच्या ६३ प्रजातींचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्याच्या वनविभागात नावलौकिक मिळविणारे येथील बांबू गार्डन यू-ट्यूब झळकत आहे. या गार्डनमध्ये असलेल्या बांबूच्या दुर्मिळ आणि मौल्यवान ६३ प्रजातींची माहिती सहजतेने उपलब्ध आहे. त्यामुळे आता एका क्लिकवर बांबू गार्डनबाबत इत्थंभूत माहिती मिळणे सुकर झाले आहे.निसर्गाच्या सान्निध्यात साकारलेल्या बांबू गार्डनला भेट देणाऱ्यांमध्ये पर्यटक, निसर्गप्रेमींची संख्या दरदिवसाला वाढत आहे. या गार्डनमध्ये जतन केलेल्या बांबू प्रजातीविषयीची माहिती ही सर्वदूर पोहोचवावी, यासाठी उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांनी बांबू गार्डन यू-ट्यूबवर अपलोड केले. त्यावर बांबू प्रजाती, महत्त्व, रोजगारभिमुख उपक्रम सहजतेने झकळत आहेत. बांबूपासून रोजगार निर्मिती कशी होते, याचे सचित्र प्रात्यक्षिकदेखील लक्ष वेधणारे आहे. जगभरात विखुरलेल्या अमरावतीकरांना ही नवलाई वनविभागाने उपलब्ध केली आहे.अमरावतीची बांबू रोपे विशाखापट्टणमलाआंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या कोटापल्ली जी. माडुगुला मंडळ येथे बांबू गार्डन वॉटर फॉल साकारले जात आहे. त्याकरिता अमरावतीच्या बांबू गार्डनमधून ११ जुलै रोजी ३३५ रोपे विशाखापट्टणम येथे पाठविण्यात आली. रोपे विक्रीतून वनविभागाला ३३ हजार ५०० रुपये महसूल प्राप्त झाला आहे.बांबू गार्डनमध्ये या आहेत ६३ प्रजातीबांबू गार्डनमध्ये बांबुसा एफेनिस, बांबुसा असामिका, बांबूसा बालकुआ, बांबूसा बांबोस, बांबूसा बांबोस व्हर गिगँटिया, बांबूसा बर्मानिका, बांबूसा चर्चनिस, जेनटेनिया, लॉगीसपिकुलता, बांबूसा मल्टिप्लेक्स, मल्टिप्लेक्स अल्फोनिस कार, बांबूसा नाना, बांबूसा नुटन्स, ओलीव्हरना, पालीडा, पॉलिमोरफा, बांबूसा स्ट्रीटा, बांबूसा टेरस, टलडा, टलडा वार स्ट्रीटा, व्हेंट्रिइकोसा केमेई, बांबूसा विलगरीस, बांबूसा वामिंग, डेंड्रोकलम अस्पर, बॅन्डेसी, कॅलोस्ट्याचूझ, जिग्नॅटस, हॅमीलटोनी, लॉझीसपॅथ्यूस, मेम्रानॅक्यूज, सिक्कीमेनीज, सोमदेवई, स्ट्रीच्यूज, डिनोच्यूहिया अंदमानिका, मालकेनांदी, अ‍ॅट्रोफिलोकिया, गिगांटोचिआ अ‍ॅटर, मायक्रोट्याच्या, रोस्ट्राटा, गौडुआ अ‍ॅग्न्युस्टिफोनिया, मेवकन्ना बॅकिफेरा, अवचीएन्ड्रा इब्रास्केटा, स्प्रिक्टोरिया, ट्रॅवनकोरिया, आॅक्सनथेरा अबॅक्सिनिका, पारव्ही पोलिया, फिलीओस्टॅच असामिका, अ‍ॅरीया, अ‍ॅड्यूलिस, मान्नी, निग्रा, स्पेसूडोसा अ‍ॅपोनिका, स्पेसूडॉक्सी पेन्याथेरिया निचे, टॉकसी, सासाफार्च्युनिंग, किझोटॅक्च्युमल ब्रॅच्यूकॅडम, डिलुआ, प्रेगासीम, पॉलिमारुथम, स्ट्रीबाटिया चॅयनिज, थ्रॅसोट्याचूझ आॅलिव्हरी अशा बांबूच्या ६३ प्रजाती आहेत.