शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

वाळू उपसा प्रकरणात पोकलेन चालक-मालकाला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 05:01 IST

चांदूर रेल्वेचे तहसीलदार राजेंद्र इंगळे व तळेगाव दशासरचे ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनात गोपनीय माहितीवरून चांदूर रेल्वे तालुक्यातील झिबला येथील बेंबळा नदी धरणावर छापा टाकला असता, अवैध वाळू उपसा मिळून आला. घटनास्थळावरून दोन लाख रुपयांचे अंदाजे ५० ब्रास वाळू व ४० लाख रुपये  किमतीचे पोकलेन असा एकूण  ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : चांदूर रेल्वे तालुक्यातील येरडजवळ असलेल्या झिबला शिवारात बेंबळा नदी धरणावर अवैध वाळू उपसा करताना चांदूर रेल्वेच्या महसूल विभाग व तळेगाव दशासर पोलिसांनी २२ ऑक्टोबर रोजी संयुक्तरीत्या छापा टाकून एकूण ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणात पोकलेन चालक-मालकाला नोटीस बजावल्याची माहिती महसूल विभागाकडून प्राप्त झाली असून, त्यानंतर कारवाई होणार असल्याचे समजते. पोलिसात या प्रकरणात तक्रार देण्यात आलेली नाही.चांदूर रेल्वेचे तहसीलदार राजेंद्र इंगळे व तळेगाव दशासरचे ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनात गोपनीय माहितीवरून चांदूर रेल्वे तालुक्यातील झिबला येथील बेंबळा नदी धरणावर छापा टाकला असता, अवैध वाळू उपसा मिळून आला. घटनास्थळावरून दोन लाख रुपयांचे अंदाजे ५० ब्रास वाळू व ४० लाख रुपये  किमतीचे पोकलेन असा एकूण  ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोकलेन चालक वीजेंद्र बुद्धसेन कुमार (२८, रा. छाचई, जि. शहडोल, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेण्यात होते. या ठिकाणी बऱ्याच दिवसांपासून हा उपसा सुरू होता. अखेर या ठिकाणी कारवाई करण्यात आली. परंतु, हा उपसा करणारा खरा सूत्रधार कोण,  याचा सुगावा अद्याप यंत्रणेला लागलेला नाही. तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी जप्त पोकलेनचे मालक व चालक यांना नोटीस बजावली असून, त्यांच्या खुलाशानंतर कारवाई होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पोकलेन मालक तारीकभाई लोखंडवाला (रा. यवतमाळ) व पोकलेन चालक वीजेंद्र कुमार (रा. छाचई, मध्य प्रदेश) या दोघांना या प्रकरणात नोटीस बजावली आहे. त्यांच्या खुलाशानंतर पुढील कारवाईची प्रक्रिया करण्यात येईल. - राजेंद्र इंगळे, तहसीलदार, चांदूर रेल्वेचे 

या प्रकरणात महसूल विभागाकडून कुठलीही तक्रार देण्यात आली नाही. तक्रार आल्यास एफआयआर दाखल करू. - अजय आकरे ठाणेदार, तळेगाव दशासर

 

टॅग्स :sandवाळू