शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेश नाकारणाऱ्या शाळांना बजावणार नोटीस

By admin | Updated: April 28, 2015 00:05 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षणातील जागांवर पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक असून ...

शेवटचे दोन दिवस : शिक्षण हक्क प्रवेशअमरावती : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षणातील जागांवर पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक असून प्रवेश देण्यास टाळाटाळ करणाऱ्या शाळांनी शिक्षण प्रवेशात कुचराई केल्यास अशा शाळांवर कारवाई करण्याचा इशारा शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांनी दिला आहे. आरटीई अंतर्गत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश देणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे. मात्र काही शाळांकडून प्रवेश देण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत. त्याची दखल घेत शिक्षण विभागाने प्रथम प्रवेश प्रक्रियेची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश दिले आहेत. आरटीई अंतर्गत प्रवेशास पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी २३ एप्रिलपर्यंतची डेडलाईन विविध शाळांना शिक्षण विभागाने दिली होती. मात्र या मुदतीतही आरटीई प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पुन्हा आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेस २९ एप्रिलपर्यंत मुदत वाढवून दिली. अंमलबजावणी न झाल्यास अशा शाळांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव शिक्षण मंडळाकडे पाठविण्याची ताकीद शिक्षणाधिकारी यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)शिक्षण हक्कांतर्गत २५ टक्के आरक्षणाचे नियम लागू होणाऱ्या शाळांमध्ये नर्सरीमध्ये (पूर्व माध्यमिक) किंवा पहिली (प्राथमिक) मध्ये एन्ट्री लेव्हल (उपलब्धतेनुसार) प्रवेश देणे बंधनकारक आहे. त्याबाबत सर्व शाळांना सूचना दिल्या असून प्रवेश न देणाऱ्या संस्थांचा अहवाल शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे पाठविण्यात येईल. - श्रीराम पानझाडेशिक्षणाधिकरी, प्राथमिक जि. प.